वरळी येथील अधिसूचित क्षेत्र
नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 25 सप्टेंबर, 2025 रोजीच्या अधिसूचना क्र. टिपीबी-4321/प्र.क्र.130/2021/नवि-11 अन्वये बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विकास योजनेमधील सि.एस. क्र. ५/८६६, १४/८६६, ९११-९१२-९१३-९१४-९१५-९८२B, ८६६/७-८६६/८, ८६६/१०-८६६/११-८६६/१२-८६६/१३, १/४५, ८६६/९, ९१८, ८७२-८७३, ८७४-८७५, ८९९, ९९२ (भाग), ९१६, ९०० व ८७६ (भाग) वरळी डिव्हीजन, मुंबई ही क्षेत्र (सुमारे 5.03 हे.) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 40(1) अंतर्गत अधिसूचित क्षेत्र म्हणून घोषित करून सदर अधिसूचित क्षेत्राकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ (Special Planning Authority - SPA) म्हणून नियुक्त केले आहे.
| S. No. | Title | Download |
|---|---|---|
| 1 | विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीबाबतची अधिसूचना, दि. 25/09/2025 | Download |
| 2 | अधिसूचित क्षेत्र दर्शविणारा नकाशा | Download |
| 3 | भू-वापर बदलाबाबत सूचना/ हरकती बाबतची अधिसूचना, दि. 25/09/2025 | Download |
उपरोक्त परिस्थिती आणि वस्तुस्थिती विचारात घेता आणि उक्त अधिनियमाच्या कलम 37 च्या पोट कलम (1कक) अनुसार बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील सदर अधिसूचित क्षेत्राचा दर्शविण्यात आलेला “मरीन रिसर्च इन्स्टीट्यूट, ॲक्वारियम, एक्झीबिशन सेंटर” चे आरक्षण रद्द करून सदर जागा वाणिज्य विभागात समाविष्ट करणे संदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाने दि. 25/09/2025 रोजीच्या स्वतंत्र अधिसूचनेअन्वये जनतेकडून सूचना हरकती मागविल्या आहेत. उपसंचालक, नगर रचना, बृन्हमुंबई यांची नियुक्त अधिकारी म्हणून नेमणूक केली असून नियुक्त अधिकारी यांचे स्तरावर कार्यवाही करून त्याबाबतच्या अहवाल शासनाच्या नगर विकास विभागास सादर केला आहे.
वरळी येथील अधिसूचित क्षेत्रातील जमिनींचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी बृहत् आराखडा तयार करून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येईल.



