inner-banner

ठाणे महानगर परिवहन (TMT) बस डेपोचा विकास व झोपडपट्टी पुनर्वसन

दिनांक 09/10/2023 रोजी मा. महानगर आयुक्त (मुं.म.प्र.वि.प्राधिकरण .), मा. खासदार,  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ठाणे महानगरपालिका तसेच, मुं.म.प्र.वि.प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेशामधील बस डेपो जमिनींचा विकास व झोपडपट्टीग्रस्त शासकीय जमिनींच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. 

यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक यांनी दिनांक 14/02/2024 रोजीच्या पत्राद्वारे मुं.म.प्र.वि.प्राधिकरण . कडे आवश्यक कार्यवाही करण्याचा प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावात कोपरी, कावेसर, कोळशेत, मुंब्रा व खिळकली येथील पाच टी.एम.टी. बस डेपोचा विकास (एकूण क्षेत्रफळ सुमारे 8.74 हेक्टर) तसेच सध्या झोपडपट्ट्यांनी अतिक्रमित शासकीय जमिनींवरील (एकूण क्षेत्रफळ सुमारे 10.84 हेक्टर) पुनर्वसनाचा समावेश आहे. 

त्यास प्रतिसाद म्हणून मुं.म.प्र.वि. प्राधिकरणातर्फे  सविस्तर प्रस्ताव तयार करून मार्च 2024 मध्ये झालेल्या 156 व्या प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावात टी.एम.टी. बस डेपो व संलग्न अतिक्रमित जमिनींच्या एकात्मिक विकासास तत्त्वतः मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच, ई-टेंडर प्रक्रियेद्वारे सल्लागार नेमून साइट सर्वेक्षण करणे, सविस्तर व्यवहार्यता अहवाल (DFR), सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) व वास्तु रचना तयार करण्यास मान्यता घेण्यात आली आहे. 

याशिवाय, शासन निर्णय दिनांक 21/09/2023 अन्वये ठाणे महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांच्याशी संयुक्त उपक्रम (Joint Venture) पद्धतीने पुनर्वसनाची अंमलबजावणी करणे, बस डेपो जमिनींच्या पुनर्विकासातून महसूल निर्मिती करणे व आरक्षणे टी.एम.सी. कडे हस्तांतरित करणे यास मान्यता घेण्यात आली आहे. अंमलबजावणीसंदर्भातील सर्व कार्ये हाती घेण्यासाठी महानगर आयुक्त यांना अधिकृत करण्यात आले आहे. 

ठळक वैशिष्ट्ये 

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठाणे महानगर परिवहन (TMT) बस डेपोचे आधुनिकीकरण तसेच सार्वजनिक उद्देशाच्या आरक्षणाखालील संलग्न शासकीय जमिनींचा झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून एकात्मिक विकास करण्याचा प्रस्ताव आहे. ठाणे महानगरपालिका आपल्या मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणग्रस्त व झोपडपट्टीग्रस्त शासकीय जमिनींचे पुनर्विकास करण्याचा मानस ठेवत असून, सदर जमिनी प्रस्तावित टी.एम.टी. बस डेपो परिसरातील 10 ठिकाणी स्थित आहेत. 

दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी मुं.म.प्र.वि.प्राधिकरण कार्यालयात झालेल्या प्रारंभिक बैठकीनंतर तसेच ठाणे महानगरपालिकेकडून दिनांक 14/02/2024 व 01/07/2024 रोजी प्राप्त पत्रव्यवहारानुसार, सह महानगर आयुक्त, मुं.म.प्र.वि.प्राधिकरण यांनी आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर व त्यांच्या टीमला प्रस्तावित विकास संकल्पना सादर करण्यासाठी आमंत्रित केले. सादरीकरणादरम्यान आर्किटेक्ट यांनी विद्यमान ठाणे महानगर परिवहन (TMT) बस डेपोच्या जमिनींचे आधुनिकीकरण करण्याचा व्यापक आराखडा मांडला. त्यामध्ये या डेपोवर एअर राईट्सचा वापर करून, परिसरातील अतिक्रमित शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी निवास प्रकल्प उभारण्याची कल्पना मांडण्यात आली. तसेच, डेपोवर उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पातील एकूण गृहसंख्येपैकी 5% घरे टी.एम.टी. कर्मचारी वर्गासाठी — जसे की बसचालक, वाहक व देखभाल कर्मचारी — यांना कर्मचारी निवास म्हणून राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या संकल्पनेचा एक भाग म्हणून, झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन टी.एम.टी. बस डेपोवरील गृहनिर्माण प्रकल्पात केल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या अतिक्रमित शासकीय जमिनी मुक्त विक्री विकासासाठी उपलब्ध होतील, ज्यामुळे एकूण योजनेच्या खर्चाची भरपाई करण्यात मदत होईल.

Figure 5-1: KOLSHET DEPOT (Total Res. Area – 2.90 Ha, Available

Figure 5-2: KAVESAR DEPOT (Total Res. Area – 6.0 Ha, Available Depot Area – 3.28 Ha

Figure 5-3: MUMBRA DEPOT (Total Res. Area – 1.13 Ha, Available Area – 0.46 Ha)

Figure 54: KOPARI DEPOT (Total Res. Area –2.98 Ha, Available Area – 1.18 Ha)

Figure 55: KHIDKALI DEPOT (Total Res. Area – 0.28 Ha, Available Area – 0.28Ha)

 

मुं.म.प्र.वि.प्राधिकरण . यांना ठाणे महानगरपालिकेचे दिनांक 11/10/2024 चे पत्र प्राप्त झाले असून, त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, आधुनिकीकरण केलेल्या बस डेपोच्या विकासासाठी प्रस्तावित 05 ठिकाणांपैकी 04 ठिकाणे विकासासाठी उपलब्ध नाहीत.

त्यामुळे, ठाणे महानगरपालिकेकडून पूर्वी ओळखण्यात आलेल्या एकूण 8.74 हेक्टर क्षेत्रफळाच्या 05 ठिकाणांपैकी केवळ खिडकली गावातील सुमारे 0.89 हेक्टर क्षेत्रफळाचे 01 टी.एम.टी. डेपो भूखंड विकासासाठी उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर, सदर प्रस्तावित कामासाठी पर्यायी ठिकाणे ओळखून देणे किंवा योग्य तो पर्याय सुचविण्याबाबत ठाणे महानगरपालिकेस विनंती करण्याची प्रक्रिया मुं.म.प्र.वि. प्राधिकरणातर्फे सुरु आहे.