जनसंपर्क कक्ष

डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से.
महानगर आयुक्त,
मुंबई महानगर विकास प्राधिकरण
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि नागरिक, विविध प्रसार माध्यमे, भागधारक यांच्यामधील संवादाचे आणि संपर्काचे महत्वाचे काम प्राधिकरणातील जनसंपर्क कक्ष करतं.

जनसंपर्क कक्षामार्फत खालील कामे पार पाडली जातात :
- एमएमआरडीएमार्फत राबविले जाणारे उपक्रम, प्रकल्प आणि कार्यक्रम यांच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रे (प्रिंट), न्युज चॅनल्स (इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे) आणि डिजिटल मिडीया इत्यादी माध्यमांशी समन्वय साधणे.
- मराठी आणि इतर आवश्यक भाषांमध्ये प्रसिध्दी पत्रकं तयार करणे आणि प्रकाशित करणे. तसेच, अधिकृत माहिती आणि प्रतिक्रिया प्रसिद्ध करणे.
- भूमिपूजन समारंभ, प्रकल्पांची उद्घाटने, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी होणाऱे सामंजस्य करार तसेच इतर प्रमुख कार्यक्रमांची माहिती प्रसिद्ध करून लोकांपर्यंत पोहोचविणे.
- सार्वजनिक माहिती प्रसारासाठी सोशल मिडीया माध्यमांसाठीची आशय निर्मिती तयार करणे, प्रकल्पांच्या माहितीपूर्ण चित्रफिती (फिल्म) तयार करणे.
- नागरिक, भागधारक, कंत्राटदार आणि सहयोगी संस्थांशी सुसंगत, स्पष्ट संवाद आणि समन्वय साधणे.



