inner-banner

आम्ही कोण आहोत

MMRDA

 

प्रादेशिक नियोजन आराखडा तयार करणे, प्रादेशिक महत्वाचे प्रकल्प तयार करणे व त्यास अर्थ सहाय्य् देणे आणि एकूण दूरदृष्टि ठेवून नियोजन करण्यात प्राधिकरण स्थापनेपासूनच कार्यरत आहे. प्रादेशिक नियोजन आराखडा, मुंबई महानगर प्रदेशाच्या शाश्वत विकासाची दिशा दाखवितो. मुंबई महानगर प्रदेशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करुन जीवनमान सुधारणे आणि प्रदेशाला आर्थिक चालना देणे हा प्राधिकरणाच्या स्थापनेमागील उद्देश होता.

नियोजन आराखडे तयार करणे, धोरणे आणि कार्यक्रम आखणे, प्रकल्पाची अंमलबजावणी करणे आणि प्रदेशामध्ये गुंतवणुकीला दिशा देणे ही प्राधिकरणाची मुख्य जबाबदारी आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या अशा :

  • प्रादेशिक विकास आराखडे बनविणे.
  • महत्वपूर्ण प्रादेशिक प्रकल्पांना अर्थसहाय्य् देणे
  • स्थानिक संस्था आणि त्यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मदत करणे.
  • मुंबई महानगर प्रदेशामधील विविध प्रकल्प अथवा योजना यांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय साधणे.
  • मुंबई महानगर प्रदेशावर विपरीत परिणाम होऊ शकेल अशा विकासास प्रतिबंध घालणे इ.

थोडक्यात, महानगर प्रदेशामध्ये महत्वपूर्ण प्रकल्पांचे संकल्पन करणे, त्यांना दिशा दाखविणे आणि त्यांच्यावर देखरेख ठेऊन नवीन विकास केंद्रे निर्माण करणे आणि वाहतूक, गृह निर्माण, पाणी पुरवठा आणि पर्यावरणामध्ये सुधारणा करणे अशी प्राधिकरणाची जबाबदारी आहे.