inner-banner

ओशिवरे जिल्हा केंद्र (ओडीसी)

दक्षिण मुंबईतील कार्यालये, बाजारपेठ, व्यापार उद्योग यांचे सुनियोजित विकेंद्रीकरण करण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १९७७ च्या "इष्टतम प्रादेशिक संरचनेच्या" धोरणातून प्रस्तावित नवी मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल इ. नवीन विकास केंद्रांपैकी ओशिवरा जिल्हा केंद्र देखील विकसित करण्याचे प्रस्तावित होते. पश्चिम उपनगरात जोगेश्वरी व गोरेगांव दरम्यान सुमारे 102 हेक्टरच्या जागेत जिल्हा केंद्र विकसित करण्याकरीता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाल्यावर प्राधिकरणाने तयार केलेल्या नियोजन प्रस्तावांस शासनाने दिनांक १६ जानेवारी, १९९२ रोजी मान्यता दिली.

तत्पश्चात शासनाने त्यांच्या दिनांक 18 नोव्हेंबर, 2015 रोजीच्या अधिसूचनेअन्वये ओशिवरा जिल्हा केंद्रातील स्वामी विवेकानंद रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग हा प्राधिकरणाच्या विशेष नियोजन क्षेत्राच्या हद्दीतून वगळून त्याचा समावेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात केला आहे. तसेच, शासनाने त्यांच्या दिनांक 18 नोव्हेंबर, 2015 रोजीच्या दुस-या अधिसूचनेअन्वये ओशिवरा जिल्हाकेंद्रातील वाणिज्यिक (एकात्मिक विकास) व वाणिज्यिक (रुपांतर) या वापर विभागासाठी अनुज्ञेयचटई क्षेत्र निर्देशांक 1.5 चा 4.00 तसेच निवासी, निवासी व दुकाने, सामाजिक व सांस्कृतिक सुविधा, सार्वजनिक व वापर सेवा, मिश्र भूमि उपयोगिता या वापरासाठीअनुज्ञेयचटई क्षेत्र निर्देशांक 3.00 एवढा केला आहे. मंजूर नियोजन प्रस्तावानुसार जमीन मालकांच्या सहभागाने प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा, पर्जन्य जलवहन व मलनिःसारण या सेवा बृहन्मुंबई महानगरपालिका पुरविते. सद्यस्थितीत प्राधिकरणाने या क्षेत्रातील रस्त्यांचे (पेयजलवाहिनी, पर्जन्य जलवाहिनी व मलनिःसारण वाहिनी सह) बांधकाम हाती घेतले आहे.

List of Maps

Oshiware District Centre (ODC)
Sr.No. Title Download/View
1 Notification of appointment of SPA for ODC (1.37 MB)
2 Notification of sanction to the Planning Proposals for Oshiwara District Center (1.83 MB)
3 Oshiwara Planning Proposal booklet along with Plan (14.12 MB)
4 ODC Sanctioned Planning proposals Plan (317.13 KB)