inner-banner

सामाजिक विकास कक्ष

श्री. शिवाजी द. दावभट

 

श्री. शिवाजी द. दावभट

प्रमुख, 

सामाजिक विकास कक्ष

 

सामाजिक विकास कक्षातर्फे प्राधिकरणाच्या महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याकरीता आवश्य्क जमीन मोकळी करुन देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन व पुर्नवसाहत करण्याची तसेच त्यासाठी पुरक सामाजिक घटकासंबंधीची कार्य हाती घेण्यात येतात. सामाजिक विकास कक्षातर्फे पार पाडण्यात येणारी मुख्य् कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :-

  • प्राधिकरणाच्या प्रकल्पामध्ये बाधित तसेच होस्ट् कम्युनिटी मधील निवासी व अनिवासी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, सामाजिक मत्यांचे (Assest) पुर्नस्थापना करणे आणि प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांना सामाजिक सुविधा उपलब्ध् करुन देणे.
  • विविध पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आवश्य्क जमिनीचे संपादन करणे.
  • प्रकल्पांच्या जागा मोकळया करण्यासाठी प्राधिकरणाच्या प्रकल्प् अंमलबजावणी विभागाशी समन्व्य साधणे. स्थलांतरीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच गृहनिर्माण संस्थांच्या संघामध्ये संघटीत करणे आणि प्रकल्पग्रस्तांनी व त्यांच्या संघटनाशी सामायिक मत्तांचे (ॲसेटस्) व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करणे अशा प्रकारची पुनर्वसोत्त‍्र कार्ये.
  • पुर्नवसाहत इमारतींची एक वेळची दुरुस्ती तसेच वसाहतीमधील पायाभूत सुविधांचे एक वेळची श्रेणीवाढ करण्याकरीता प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागाशी समन्व्य साधणे.
  • सदनिकांचा साठा प्राप्त करण्यासाठी प्राधिकरणाच्या एस.आर.ए. कक्षासोबत आणि मिळकत व्यवस्थापन कार्याकरीता भूमी व मिळकत कक्षाशी समन्व्य साधणे, प्रकल्पग्रस्तांच्या, विशेषत: दुर्बल कुटुंबांच्या, उपजिवीका सहाय्य् साधांकरीता कार्य संघटीत करणे आणि पुर्नवसाहत वसाहतीमधील आरोग्य् व शिक्षण क्षेत्रातील सुविधा उपलब्ध् करुन देण्याच्या कार्यात मदत करणे.
  • प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण, समाजिक परिणाम मुल्यांकन अभ्यास आणि पुर्नवसाहताचे मुल्यमापान या संबंधीची कार्ये.
  • इतर संस्थांच्या प्रकल्पाग्रस्तांचे पुर्नवसन करण्यासाठी अशा संस्थांनासदनिका वितरीत करणे.

प्राधिकरणाच्या इतर विभागांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांचे आणि कार्याचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारे पुरक ठरणारी कार्ये सामाजिक विकास कक्षाद्वारे करण्यात येतात.

SDC Chart Marathi

×

Rate Your Experience