inner-banner

प्रस्तावना

मुंबई महानगर प्रदेश विकास निधी (मुं.म.प्र.वि. निधी)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आपल्या जमिनी भाडेपट्टयाने देऊन तसेच इतर उत्पन्नातून ‘मुंबई महानगर प्रदेश विकास निधी’ निर्माण केला riआहे. सदर निधी इतर वापरांसह, प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांकरिता त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य व इतर संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वित्त सहाय्य करण्याकरिता वापरण्यात येतो. सदर निधीची नागरी मुलभूत सुविधांसाठी अथवा इतर प्रकल्पांसाठी कर्ज सहाय्याच्या व अनुदान स्वरुपात देण्यात येतो.

मुं.म.प्र.वि. निधी मधून नियोजन विभागामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या निधीचे तपशील:

प्राधिकरणाच्या या निधीतून महानगर प्रदेशातील 14 स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर शासकीय संस्था मिळून 50 प्रकल्पांना एकूण ₹2562.94 कोटी निधी कर्ज व अनुदान स्वरुपात मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी सदर कामांकरीता मे, 2023 अखेरपर्यंत ₹2269.98 कोटी निधी कर्ज व अनुदान स्वरुपात वितरित करण्यात आलेला आहे. या निधी अंतर्गत एकूण 50 प्रकल्पांपैकी 49 प्रकल्पांना दिलेले आर्थिक सहाय्य पूर्ण झाले असून उर्वरित एका प्रकल्पासाठी मंजूर रक्कमेपैकी रु.6.03 कोटी वितरित करणे बाकी आहे. सदर प्रकल्पांची यादी खालीलप्रमाणे आहे:

अ. क्र. प्रकल्प संस्था वित्तपुरवठा प्रकार
1 जेजे रुग्णालयाच्या आधुनिकरण जेजे ग्रुप हॉस्पिटल अनुदान
2 सिव्हिल हॉस्पिटल आधुनिकरण आणि उपकरणे जेजे ग्रुप हॉस्पिटल
3 वालधुनीच्या चॅनेलायझेशनसाठी प्रकल्प अहवाल कल्याण डोंबिवली महानगरपालिका
4 शहापाडा (पेण) पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
5 के.एन.पी मार्केटचा पुनर्विकास बृहन्मुंबई महानगर पालिका
6 कर्मचारी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम उल्हासनगर नगरपरिषद
7 विरारमधील लेव्हल क्रॉसिंग 40 येथे आर.ओ.बी वसई विरार महानगरपालिका
8 पथदिवे प्रकल्प बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST) कर्ज
9 खारघर येथे अंडरपास शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO)
10 खांदेश्वर येथील आर.ओ.बी. (भाग-1) शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO)
11 कळंबोली येथील औद्योगिक केंद्राचा विकास शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO)
12 शॉपिंग कॉम्प्लेक्स सह टाऊन हॉल कल्याण डोंबिवली महानगरपालिका
13 क्रीडा संकुल कल्याण डोंबिवली महानगरपालिका
14 कल्याण स्टेशनवर बहुमजली पे आणि पार्क कल्याण डोंबिवली महानगरपालिका
15 डोंबिवली स्थानकाजवळ एफओबी आणि रिक्षा स्टँडचे बांधकाम कल्याण डोंबिवली महानगरपालिका
16 शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि टाऊन हॉल (वाढीव खर्च) कल्याण डोंबिवली महानगरपालिका
17 कल्याण येथील पंपिंग स्टेशनची क्षमता वाढवणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका
18 मांडवा-टिटवाळा पाणीपुरवठा योजनेचे संवर्धन कल्याण डोंबिवली महानगरपालिका
19 भूमिगत गटार कल्याण डोंबिवली महानगरपालिका
20 वादळी पाण्याचा निचरा कल्याण डोंबिवली महानगरपालिका
21 150 एमएलडी पाणीपुरवठा योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका
22 विद्यमान पाणी पुरवठा वाढवणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका
23 रस्त्यांचे काँक्रिटीकरण कल्याण डोंबिवली महानगरपालिका
24 भूमिगत गटारे प्रणाली कुळगाव बदलापूर नगरपरिषद
25 एम.एस.जे.एन.एम. अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्प (1) मिरा भाईंदर महानगरपालिका
26 सूर्या पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
27 वरळी-वांद्रे सीलिंक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
28 मुंबई-III पाणीपुरवठा योजना बृहन्मुंबई महानगर पालिका
29 मुंबई-III A पाणीपुरवठा योजना बृहन्मुंबई महानगर पालिका
30 नायर रुग्णालयाचा वाढवणे बृहन्मुंबई महानगर पालिका
31 पाणी पुरवठा व्यवस्थेचे संवर्धन नवी मुंबई महानगरपालिका
32 गटारे प्रणालीचे संवर्धन नवी मुंबई महानगरपालिका
33 पाणीपुरवठा नवी मुंबई महानगरपालिका
34 वाहतूक नवी मुंबई महानगरपालिका
35 सामान्य रुग्णालयाची कामे नवी मुंबई महानगरपालिका
36 गावातील टाक्यांची सुधारणा नवी मुंबई महानगरपालिका
37 इमारतीचे बांधकाम पु.ल.देशपांडे अकादमी
38 कळवा पुलाचे बांधकाम ठाणे महानगरपालिका
39 100 एम.एल.डी पाणीपुरवठा योजना (भाग-1) ठाणे महानगरपालिका
40 भाजी मंडईचे बांधकाम ठाणे महानगरपालिका
41 100 एम.एल.डी पाणी पुरवठा योजना (भाग-II) ठाणे महानगरपालिका
42 अतिरिक्त 110 एम.एल.डी पाणीपुरवठा योजना ठाणे महानगरपालिका
43 एकात्मिक नाला विकास टप्पा II ठाणे महानगरपालिका
44 एकात्मिक नाला विकास टप्पा I ठाणे महानगरपालिका
45 भुयारी गटार योजना टप्पा-I ठाणे महानगरपालिका
46 भुयारी गटार योजना टप्पा-II ठाणे महानगरपालिका
47 भुयारी गटार योजना टप्पा-III ठाणे महानगरपालिका
48 एकात्मिक नाला विकास टप्पा III ठाणे महानगरपालिका
49 JNNURM बाहेरील 3 रस्त्यांचे काँक्रिटीकरण ठाणे महानगरपालिका
50 सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वसई विरार महानगरपालिका

वर नमूद केलेल्या प्रकल्पांव्यतिरिक्त मुं.म.प्र.वि. निधी मधून विशेष प्रकल्पांतर्गत 4 प्रकल्पांसाठी एकूण रु.41.64 कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. त्यापैकी रु. 23.8 कोटी निधी मे, 2023 अखेरपर्यंत वितरित करण्यात आलेला आहे. विशेष प्रकल्पांची यादी खालीलप्रमाणे आहे:

अ.क्र. प्रकल्प संस्था
1 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे नॅचरल हिस्ट्री कलेक्शन्सचे डिजिटायझेशन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)
2 घारापुरी (एलिफंटा) बेटाचे विद्युतीकरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL)
3 मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिटला निधी मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट (MTSU)
4 माथेरान हिल स्टेशनवर मिनी-ट्रेन शटल सेवा मध्य रेल्वे

याशिवाय प्राधिकरण 1999 पासून महानगर प्रदेशातील गावांचे राहणीमान व पर्यावरण यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने ग्राम विकास योजना व आदिवासी विकास योजना अंतर्गत नाच्या स्वरुपात मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत जिल्हा परिषदांस अनुदान देत आले आहे. त्यासाठी 2004 पासून, एकात्मिक ग्राम विकास योजना (IVDS) राबविण्यात येत आहे.

सदर योजनेमध्ये एकूण पात्र 109 गावांकरीता प्रत्येकी ₹25.00 लाख अनुदान देण्याची तरतूद होती. सदर योजना मार्च, 2017 मध्ये संपुष्टात आली असून, सदर योजनेंतर्गत मार्च, 2017 नंतर कुठल्याही नवीन कामांना मंजूरी देण्यात आली नाही. मार्च, 2017 अखेर 106 गावांतील एकूण ₹26.19 कोटींच्या 221 कामांना मान्यता प्रदान करण्यात आली होती. आतापर्यंत मंजूर झालेल्या कामांकरीता ₹22.72 कोटी इतका निधी अनुदान स्वरुपात वितरित केला आहे. सदर अनुदानांच्या तपशील खाली दिलेला आहे:

तालुका पात्र गावांची संख्या प्रस्ताव प्राप्त झालेल्या गावांची संख्या प्राप्त प्रस्तावांची संख्या मंजूर प्रस्तावांची संख्या पूर्ण झालेले प्रकल्प
अंबरनाथ 10 10 10 33 33
भिवंडी 10 10 39 39 22
कल्याण 19 19 39 38 33
वसई 10 10 21 21 19
अलिबाग 10 10 19 19 12
कर्जत 10 8 12 8 6
खालापूर 10 9 10 9 9
पनवेल 10 10 18 18 15
पेन 10 10 17 17 17
उरण 10 10 19 19 17
एकूण 109 106 227 221 183