inner-banner

जागतिक वित्तीय सेवा केंद्र

article (4)

वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये जागतिक वित्तीय सेवा केंद्र (IFSC) स्थापन करणे बाबत.
  1. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे वांद्रे-कुर्ला संकुल अधिसूचित क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण असून शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखडयानुसार सदर अधिसूचित क्षेत्रातील "ई" व "जी" ब्लॉकमधील प्राधिकरणाच्या मालकीच्या जमिनींचे वितरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (जमिनीची विल्हेवाट) विनियम, 1977 मधील तरतूदीनुसार करण्यात येते. सदर विनियमातील तरतूदीनुसार प्राधिकरणाच्या जमीनी/ भूखंड हे अधिमूल्य आकारुन 80 वर्षाच्या भाडेपट्टयावर वितरीत करण्यात येतात.
  2. वांद्रे-कुर्ला संकुलातील "ई" ब्लॉकचे विकसन जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. प्राधिकरणाने वास्तुशास्त्रज्ञ आणि वास्तुशिल्प फाऊंडेशनचे प्रमुख श्री. बी. व्ही. दोशी यांच्या मार्फत वांद्रे-कुर्ला संकुलाच्या "जी "ब्लॉकमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यापार केंद्रासाठी नकाशे आणि नागरी संकल्प चित्र तयार करुन घेतले आहेत. प्राधिकरण "जी" ब्लॉक हा 'आंतरराष्ट्रीय वित्तीय व व्यापार केंद्रासाठी' (IFBC) विकसित करीत आहे.
  3. "जी" ब्लॉक वित्तीय केंद्र म्हणून विकसित झाला आहे व त्यास पुरक असे वांद्रे-कुर्ला संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोठया कंपन्यांनी त्यांची कार्यालये स्थापित करुन हे क्षेत्र 'जागतिक वित्तीय सेवा केंद्र' (IFSC) म्हणून विकसित करण्याची शासनाची योजना आहे. त्यामुळे या संकुलाचा विकास तर होईलच शिवाय आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहार (transaction) मुंबईत सुरु झाल्यावर राज्याला मोठया प्रमाणात उत्पन्न देखील प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.
  4. वांद्रे-कुर्ला संकुलातील 45 मी. रुंदीच्या प्रमुख रस्त्याच्या उत्तरेकडचा "जी टेक्स्ट" - ब्लॉक हा जागतिक वित्तीय सेवा केंद्रासाठी अतिशय उपयुक्त आहे. सदर क्षेत्र हे वाणिज्यिक वापरासाठी दर्शविले आहे. या "जी-टेक्स्ट" ब्लॉकमधून यापूर्वी वाटप केलेले वाणिज्यिक भूखंड, मैदाने, रस्ते व सार्वजनिक सोयीसुविधा यासाठीचे आरक्षित क्षेत्र वजा केले असता अंदाजे 30 हे. एवढे वाणिज्यिक क्षेत्र 'जागतिक वित्तीय सेवा केंद्राच्या’ विकसनासाठी उपलब्ध आहे. तसेच आणखी 20 हे. हरीत क्षेत्र उपलब्ध आहे म्हणजेच एकंदर अंदाजे 50 हे. क्षेत्रावर ‘जागतिक वित्तीय सेवा केंद्र’ बांद्रा-कुर्ला संकुलात स्थापन करण्याचे प्रयोजन आहे. सदर क्षेत्रासाठी अनुज्ञेय ॲग्रीगेट चटई क्षेत्र निर्देशांक 4.00 इतका आहे. सध्या सिव्हील एव्हीएशन अॅथॉरिटीने जी-टेक्स्ट ब्लॉकसाठी दिलेली उंची साधारणतः 51.75 मी. ते 61.45 मी. (ओ एम् एस् एल् ) एवढी आहे.
  5. सदर ब्लॉक हा 45 मी. व 30 मी. रस्त्याने जोडला असून पश्चिमेकडून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने व पूर्वेकडून सांताक्रुझ चेंबुर लिंक रोडने जोडलेला आहे. मुंबई युनिव्हरसिटीच्या जमिनीमधून 30 मी. च्या उन्नत मार्गाने सदर क्षेत्र हे विमानतळाला व SCLR मार्फत सदर क्षेत्र ईस्टर्न एक्सप्रेस हायवेशीही जोडण्यात येणार आहे. सदर क्षेत्र हे मेट्रो लाईन-2 आणि 3ने ही जोडणार आहे.
  6. या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचे शाळा व इस्पितळे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बगीचा विकसित झालेला आहे. सदर क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टार कॅटेगिरी हॉटेल्सची सुविधाही आहे आणि वित्तीय संस्था जसे की आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कोटक महिंद्रा बँक व वित्तीय सेवा पुरविणा-या संस्था जसे की आयएलएफएस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज अशा संस्था या क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहेत. सदर क्षेत्रामध्ये बांधीव बहुमजली सार्वजनिक वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहे. येथे अग्निशामन दलाची इमारत त्यांच्या सोयींसह कार्यान्वित आहे. तसेच या क्षेत्रामध्ये विद्युत पुरवठा पुरविण्याकरीता रिसीव्हींग स्टेशन उभारण्यात आलेले आहे.
  7. वांद्रे-कुर्ला संकुलात 'जागतिक वित्तीय सेवा केंद्र स्थापित करण्यासाठी भागधारकांचे मूल्यांकन (Assessment of Stake Holders), रेग्युलेटरी फ्रेमवर्क बनविणे, मागणीचे मूल्यांकन करणे ( Demand Assessment) याबद्दलची व्यवहार्यता तपासण्यासाठी (Feasibility Study), CBRE यांना समंत्रक (Consultant) म्हणून नेमले आहे.
  8. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जे बांद्रा-कुर्ला संकुलात 'जागतिक वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी समन्वयाचे व कार्यान्वित करण्याचे काम करणार असून या प्रकल्पास मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाने 'टास्क फोर्स' ची स्थापना केली आहे.
  9. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांद्रा-कुर्ला संकुलात् 'जागतिक वित्तीय सेवा’ स्थापनेचा बृहत आराखडा बनविण्यासाठी निविदा प्रस्तावाद्वारे सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी केली.
  10. खालील तक्त्यात नमूद केलेले दसताऐवज निविदाकारांस 'जागतिक वित्तीय सेवा केंद्रासंबंधी अधिक माहिती मिळण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहेत.
  11. अतिरिक्त माहिती आवश्यक भासल्यास jpdtp@mailmmrda.maharashtra.gov.in या ठिकाणी ई-मेलद्वारे उपलब्ध होऊ शकेल.
International Financial Service Center
Sr. No. Title Download/Details
1 बांद्रा-कुर्ला संकुल नियोजन आराखडा बांद्रा-कुर्ला संकुल नियोजन आराखडा(703.56 KB)
2 बांद्रा-कुर्ला संकुल डीसीआर (DCRs) बांद्रा-कुर्ला संकुल डीसीआर (DCRs)(63.97 KB)
3 विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005/दिनांक 28/09/2015 पर्यंत सुधारित केलेली नियमावली विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005/दिनांक 28/09/2015 पर्यंत सुधारित केलेली नियमावली(5.48 MB)
4 ‘जागतिक वित्तीय सेा केंद्र’ विशेष आर्थिक क्षेत्र मार्गदर्शक सूचना व विनियम ‘जागतिक वित्तीय सेा केंद्र’ विशेष आर्थिक क्षेत्र मार्गदर्शक सूचना व विनियम(938.6 KB)
5 बांद्रा-कुर्ला संकुलात ‘जागतिक वित्तीय सेवा केद्रा’ साठी ‘टास्क फोर्स’ ची स्थापना करणेबाबतचा दि.3/12/2015 रोजीचा शासन निर्णय. बांद्रा-कुर्ला संकुलात ‘जागतिक वित्तीय सेवा केद्रा’ साठी ‘टास्क फोर्स’ ची स्थापना करणेबाबतचा दि.3/12/2015 रोजीचा शासन निर्णय.(159.99 KB)
6 ॲटो-कॅडमध्ये तयार केलेली ‘जागतिक वित्तीय सेवा केंद्रासाठीची रेखाचित्रे ॲटो-कॅडमध्ये तयार केलेली ‘जागतिक वित्तीय सेवा केंद्रासाठीची रेखाचित्रे(2.45 MB)