inner-banner

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक

दिनांक :- 05/06/2023
संक्षिप्त टिप्पणी
1) प्रकल्पाचे नाव महापौर निवासस्थानाच्या परिसरात मा. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करणे.
टप्पा-1 अंतर्गत प्रवेशव्दार इमारत, प्रशासकीय इमारत, इंटरप्रिटेशन इमारतीचे बांधकाम करणे व महापौर निवासस्थान इमारतीचा सांस्कृतिक ठेवा जतन करुन या इमारतीचे संग्रहालयामध्ये रुपांतरीत करणे तसेच सभोवतालच्या परीसराचे सुशोभिकरण करणे इत्यादी.
टप्पा-2 हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञान, लेझरशो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/ गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्चूअल रियालटी, ऑडिओ व्हिजुअल आणि तांत्रिक घटक इत्यादी.
2) शासन स्तरावर प्रशासकीय मान्यता नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एमआरडी-2018/प्र.क्र. 147/नवि-7, दि. 16 मार्च, 2021 ₹. 400 कोटी (टप्पा 1 - ₹. 250 कोटी व टप्पा 2- ₹. 150 कोटी)
3) प्राधिकरणाची प्रशासकीय मान्यता दि. 16 नोव्हेंबर, 2021 रोजी संपन्न झालेल्या प्राधिकरणाच्या 151 बैठकीत बाब क्र. 13 व ठराव क्र. 1572 अन्वये टप्पा -1 व टप्पा-2 च्या एकत्रित कामास ₹.400 कोटी इतकी प्रशासकीय मान्यता प्रदान झालेली आहे.
4) सन 2023-2024 अर्थसंकल्पीय तरतूद प्राधिकरणाच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये सदर प्रकल्पासाठी ₹. 242.37 कोटी इतक्या रक्कमेची तरतुद करण्यात आलेली आहे.
5) टप्पा-1 साठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व कार्यारंभ आदेश दिनांक मे.आभा नरेन लांबा असोसिएट्स, (कार्यारंभ आदेश दि. 21/07/2020)
6) टप्पा- 1 साठी सल्लागार निविदा फी व रक्कम निविदा रक्कम सापेक्ष 3.50%, ₹. 6.47 कोटी
7)टप्पा- 1 कामाची निविदा रक्कम EPC निविदा – ₹. 184.87 कोटी
8)टप्पा-1 कंत्राटदार, कार्यारंभ आदेश दिनांक व देकार निविदेनुसार काम पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक टाटा प्रोजेक्ट्स लि. (कार्यारंभ आदेश दि. 24/03/2021)
निविदा देकार – ₹. 180.99 कोटी
9) कामाचा कालावधी 14 महिने (दि. 23/05/2022)
10) टप्पा-1 करीता प्रथम मुदतवाढ दि. 31/03/2023 रोजी पर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली असून, मुदतवाढीचा कालावधी संपुष्टात आलेला असल्याने,
प्राधिकरणामार्फत द्वितीय मुदतवाढीच्या प्रस्तावाची कार्यवाही प्रगतीत आहे.
11) अंतर्भुत कामे /strong>

टप्पा -1 अंतर्गत करण्यात येणारी कामे:-
• महापौर निवासस्थानाचे वारसा संवर्धन व जतन करणे.
अस्तित्वातील महापौर निवासस्थान इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे 602.39 चौ.मी आहे.
1. इमारतीचा वारसा संवर्धन करण्यासाठी इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागात स्थापत्य व विदयुत कामे करणे व इमारतीस गतवैभव प्राप्त होण्याकरीता इमारतीचे नुतनीकरण व सौदंर्यकीकरण करणे.
2. मा.बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारी दृष्यचित्रे दर्शविणारी विविध कालखंडातील छायाचित्रे.
3. मा.बाळासाहेब ठाकरे यांची कौटुंबिक माहिती व जन्मापासून ते मृत्युपर्यंतच्या कालखंडाबाबतची माहिती
4. शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासुन ते आजपर्यंतची माहिती
5. मा. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय प्रवास.
6. वृत्तपत्र, व्यंगचित्र आणि व्यंगचित्राबाबतची माहितीचे दालन

• इंटरप्रिटेशन सेंटर (Interpretation Centre) बांधणे.
सदर इमारत भुमिगत स्वरुपाची असुन, आर.सी.सी पध्दतीची आहे. इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे 1530.44 चौ.मी. आहे. इमारत तळमजला उणेएक मजला भूमिगत स्वरुपात असून, जोते भागात जलतलाव असणार आहे. तळघरात खालील कक्षांचा समावेश -
1. संग्राहालय
2. ग्रंथालय
3. कलाकार दालन
4. प्रसाधनगृह (महिला, पुरुष व दिव्यांगासाठी)
5. देखभाल व दुरुस्ती कक्ष
प्रवेशव्दार इमारत (Entrance Block) बांधणे.
सदर इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे 3099.84 चौ.मी आहे. इमारत तळमजला उणे दोन मजल्याची आहे. तळघरात खालील सोयीसुविधा आहेत.
1. बहुउद्देशीय सभागृह
2. सुरक्षा नियंत्रण कक्ष
3. प्रसाधनगृह (महिला, पुरुष व दिव्यांगासाठी)
4. भूमीगत वाहनतळ (32 वाहने) व वाहने ने-आण करण्यासाठी स्वतंत्र उद्वाहन
• प्रशासकीय इमारत (Admin Block) बांधणे.
प्रस्तावित इमारत ही नविन बांधकामाची असून, इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे 639.70 चौ. मी. आहे. सदर इमारत आर.सी.सी पध्दतीची तळमजल्याची इमारत असुन, छत मंगलौरी कौल पध्दतीचे आधुनिक स्वरुपात बांधण्यात येणार आहे.त्यामध्ये खालील कक्षांचा समावेश आहे.
1. कलाकार दालन कक्ष
2.उपहारगृह
3. प्रसाधनगृह (महिला, पुरुष व दिव्यांगासाठी)
4. न्यासाचे अध्यक्ष व सचिव यांचे कार्यालये
• बागबगीचा तयार करणे:
भूखंडाच्या 3.00 एकर जागेतून महापौर निवासस्थान व इतर उपरोक्त संलग्न इमारती वगळता, उर्वरीत भुखंडावर बागबगीचा तयार करून परिसराचे सुशोभिकरण करणे प्रस्तावित आहे.
टप्पा -2 अंतर्गत करण्यात येणारी कामे:-
हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञान, लेझरशो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्चूअल रियालटी, ऑडिओ व्हिजुअल आणि तांत्रिक घटक इत्यादी.

12) प्रकल्पाची सद्य:स्थिती टप्पा-1
• महापौर निवासस्थान इमारतीचे वारसा संवर्धन व जतन करण्यांतर्गत जुने छत पूर्णपणे काढण्यात येऊन, नवीन छताचे नुतनीकरणाचे काम पूर्ण. अंतर्गत सजावटीचे काम प्रगतीत. महापौर निवासस्थान इमारतीचे 71.40% काम पूर्ण.
• इंटरप्रिटेशन सेंटरच्या तळघराच्या दोन थरातील राफ्टचे आरसीसी काम पूर्ण तसेच प्लाझा स्तराचे आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण. आधारभिंतीचे आरसीसी काम पूर्ण. इंटरप्रिटेशन सेंटरचे 76.00% काम पूर्ण.
• प्रवेशद्वार इमारतीचे तळघराचा प्रथम व द्वितीय स्तराचे आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण. प्रवेशद्वार इमारतीचे एकूण 75.50 % काम पूर्ण.
• प्रशासकीय इमारतीचे आरसीसी बांधकाम, वीट बांधकाम, गिलावा काम पूर्ण व अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण. प्रशासकीय इमारतीचे 99.00% काम पूर्ण.
टप्पा 2
• माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली असून, कंत्राटदार नेमणूकीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
13) प्रकल्पावरील दि. 4 जून, 2023 रोजी पर्यंतचा खर्च प्रकल्पावर एकूण खर्च ₹.159.19
कोटी इतका झालेला असून, यामध्ये इमारतीच्या वैधानिक परवानगी खर्च, सल्लगाराची देयक शुल्क, कंत्राटदाराच्या कामावरील देयक खर्च व बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाकडील खर्चाची प्रतिपूर्ती इत्यादींचा समावेश आहे.
14) प्रकल्पाची प्रगती For Phase – I Work
1) भौतिक प्रगती – 82.00%
2) आर्थिक प्रगती – 78.29%