inner-banner

मेट्रो पी. आई. यु.

​​Shri. Basavaraj M.Bhadragond

श्री. बसवराज म.भद्रगोंड
संचालक (प्रकल्प), मेट्रो, मेट्रो-पी.आई.यु

anil

श्री. अनिल साळुंखे
संचालक (कार्य), मेट्रो, मेट्रो-पी.आई.यु

Shri. Sushil Chandra

श्री. सुशील चंद्रा
संचालक (सिस्टम) मेट्रो, मेट्रो - पीआययू

 

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असुन व्यापार आणि उद्योग व्यवसायाचे मध्यवर्ती केंद्र आहे. मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेमधील मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे सध्याच्या उपनगरीय रेल्वे सेवेवर प्रचंड ताण पडत आहे. बससेवेची भूमिका केवळ उपनगरीय रेल्वेला पूरक सेवा पुरविणे एवढयापर्यंत मर्यादित आहे.

सध्याच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीची जोडणी नसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना रेल्वे आधारित सामूहिक जलद परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई मेट्रोचा बृहत आराखडा हाती घेण्यात आला, जेणेकरून त्यांना ½ ते 1 किमी अंतरावरील स्थानकांपर्यंत पोहोचता येईल.

मुंबईमध्ये एक सुरक्षित, आरामदायक रेल्वे आधारीत सामूहिक जलद परिवहन सेवा पुरविण्याच्या दृष्टीने तसेच प्राधान्यक्रम असलेल्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिल्ली मेट्रो रेल महामंडळाची (डि.एम.आर.सी) (ज्यांना टाटा सल्लागार संस्था-TCS आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था - IIT, मुंबई यांनी मदत केली) माहे मे, 2003 मध्ये नेमणूक केली होती.

मुंबई मेट्रोच्या बृहत आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाने 28 मे, 2004 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली. बृहत आराखड्यामध्ये 146.5 किमी लांबीच्या 9 मार्गांचा समावेश आहे, त्यापैकी 32.5 किमी भूमिगत आणि उर्वरित उन्नत मार्ग आहेत. बृहत आराखड्यावर मते, सूचना आणि हरकतींसाठी 22 जानेवारी, 2004 रोजी सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली.

सदर आराखड्यातील मार्गांचे अंमलबजावणी धोरण निश्चित करतेवेळी व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना त्यात काही बदल करण्यात आले.

मेट्रो पी. आई. यु.
अंमलबजावणीसाठी प्रस्तावित सुधारित मेट्रोचा बृहत आराखडा खालीलप्रमाणे आहे: :
मार्ग. मार्गिका लांबी (कि.मी)
मार्ग 1

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर

11.40
मार्ग 2अ

दहिसर-डि. एन. नगर

18.6
मार्ग 2ब

डि.एन.नगर– मंडाळे

23.6
मार्ग 3

कुलाबा-सिप्झ)

33.5
मार्ग 4

वडाळा- कासारवडवली

32.3
मार्ग 4अ

कासारवडवली- गायमुख

2.7
मार्ग 5

ठाणे –भिवंडी-कल्याण

24.9
मार्ग 6

स्वामी समर्थनगर -विक्रोळी

14.5
मार्ग 7

अंधेरी (पू)-दहिसर (पू)

16.5
मार्ग 8

विमानतळ मार्ग (छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)

35
मार्ग 9 व मार्ग 7अ

दहिसर – मिराभाईदर व अंधेरी - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

13.5
मार्ग 10

गायमुख – शिवाजी चौक (मिरा रोड )

9.2
मार्ग 11

वडाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

12.7
मार्ग 12

कल्याण-तळोजा

20.7
मार्ग 13

शिवाजी चौक (मीरा रोड) – विरार

23
मार्ग 14

कांजूरमार्ग – बदलापूर

45
 

एकूण लांबी

337.1

वरील माहितीसह मेट्रो मार्गांची एकूण लांबी 337 कि.मी. असेल आणि यापैकी बहुतांश मेट्रो मार्ग सन 2024-26 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्व मेट्रो मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर मेट्रोच्या जाळ्यांद्वारे दररोज सुमारे 100 लाख प्रवासी त्याचा फायदा घेऊ शकतील, जी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीच्या 1.3 पट आहे, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता दुपटीने वाढून पुढील चार ते पाच दशकांसाठी मुंबईतील वाहतूक समस्यांवर दिलासा मिळणार आहे.

You can reach through email at - 

मेट्रो मार्गांची कालबद्ध रीतीने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून आणि विविध केंद्र आणि राज्य प्राधिकरणे, एजन्सी, ADB, बाह्य निधी संस्था आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) यांच्याशी समन्वय साधण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये एक स्वतंत्र मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेची (Metro PIU) स्थापना करण्यात आली आहे.

मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेमध्ये स्थापत्य, प्रणाली, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत, प्रशासकीय, नगर नियोजन आणि वित्त यांसारख्या विविध विषयांचा समावेश करणारे अनेक विभाग आहेत.

मेट्रो मार्गांचे संरेखन आता Google Earth वर उपलब्ध आहेत आणि MCGM, राज्य आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने "व्यवसाय करणे सुलभ" चा भाग म्हणून MCGM वेबसाइटशी जोडलेले आहेत.

नागरिक आणि विकासक/मालक Google Earth वरील संरेखन नकाशांचा वापर करू शकतात आणि मेट्रो मार्गिकांच्या प्रभावक्षेत्रात मालमत्ता अंशतः किंवा पूर्णत: प्रभावित होत असल्यास प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊ शकतात

मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेचा तक्ता