Twin Tube Tunnel between Thane and Borivali
ठाणे ते बोरीवली दरम्यान दोन भयुारी मार्ग आणि बोगद्या जवळचा मार्ग व इतर नागरी बांधकामाची कामे करणे
सद्यस्थितीत ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करावा लागतो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासाचा कालावधी वाढुन मोठ्या प्रमाणावर प्रवाश्यांना मानसिक त्रास व इंधन अपव्यय होत आहे.
या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी व ठाणे ते बोरीवली दरम्यान वाहतुक वेळेत कमी होण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) ठाणे व बोरीवली शहरे जोडण्याकरीता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालुन दुहेरी बोगदा मार्गाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या बोगद्यामुळे ठाणे व बोरिवली यांच्यात अखंडित आणि थेट रस्ते जोडणी उपलब्ध होणार असून, मुंबई महानगर प्रदेशातील प्रादेशिक दळणवळण व वाहतूक गतिशीलतेत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
सद्यस्थितीत घोडबंदर मार्गे ठाणे ते बोरिवली हे सुमारे 23 कि.मी. अंतर पार करण्यासाठी अंदाजे 1 ते 1.5 तासांचा कालावधी लागतो. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ 15 मिनिटांत पार करता येणार असून सुमारे 1 लाख नागरिकांना सुलभ व वेळेची बचत करणारा प्रवास उपलब्ध होणार आहे.
बोगद्याचा भाग संरक्षित वन क्षेत्रातून जात असल्याने, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर कमीत कमी परिणाम होण्यासाठी अत्याधुनिक Tunnel Boring Machine (TBM) तंत्रज्ञानाद्वारे बोगदा खोदकाम करण्यात येत आहे. प्रत्येक बोगद्यात 1 आपत्कालीन मार्गिकेसहीत एकूण 3 मार्गिका उपलब्ध राहतील. दोन्ही बोगद्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दर 300 मीटर अंतरावर क्रॉस पॅसेजद्वारे जोडण्यात येणार आहे. तसेच वायुवीजन प्रणाली, अग्निशमन यंत्रणा, धूर शोधक व प्रकाशयुक्त सूचना फलक प्रस्तावित आहेत. सदर प्रकल्पाचे भूमिपूजन मा. पंतप्रधान महोदय यांच्या शुभहस्ते दिनांक 13 जून 2024 रोजी करण्यात आले.
सदर प्रकल्पास प्राधिकरणाच्या दिनांक 10 मार्च 2023 रोजीच्या 154 व्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच, प्राधिकरणाच्या दिनांक 04 मे 2023 रोजीच्या 275 व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांची कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर प्रकल्पाचे कामास दिनांक 19 मे 2023 रोजी सुरुवात झाली.
मे. हिल इंटरनॅशनल प्रोजेक्ट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड (जेव्ही) या सल्लागारास दि.20 जून 2024 रोजी कार्यारंभ आदेश (Notice to Proceed) देण्यात आलेले आहेत.
शासनाने सदर प्रकल्पास दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास व इतर प्रकल्प अनुषंगिक बाबी जसे की, बाह्य कर्ज सहाय्य/इतर वित्तीय संस्थांमार्फत कर्ज उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर प्रकल्प “महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प” व “निकडीचा सार्वजनिक प्रकल्प” म्हणून घोषित करण्यात आला आहे.
सद्यस्थिती
पॅकेज 1 (बोरिवली बाजू)
- सद्यस्थितीत, प्रकल्पातील पॅकेज 1 (बोरिवली बाजू कडील) कास्टिंग यार्डची उभारणी सुरू आहे.
- लॉंचिंग शाफ्ट क्षेत्रात पाईलिंगचे काम प्रगतीपथावर आहे.
- बोरिवली बाजू कडील टीबीएम-3 चे दिनांक 29 मे 2026 रोजी चेन्नई येथे फॅक्टरी ॲक्सेप्टंस टेस्ट (FAT) पूर्ण झाली आहे.
पॅकेज-2 (ठाणे बाजू)
- ठाणे बाजू कडील टीबीएम-1 (नायक) चा शुभारंभ कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते व मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत दि. 07 एप्रिल 2026 रोजी पार पडला असून बोगद्याचे खोदकाम प्रगतीपथावर आहे.
- तसेच, टीबीएम-2 (अर्जुना) ची दिनांक 25 जून 2026 रोजी साईट ॲक्सेप्टंस टेस्ट (SAT) पूर्ण झाली असून, सदर टीबीएम बोगदा खोदकामासाठी (Initial Drive) सज्ज आहे.
सदर प्रकल्पाची आजपर्यंतची भौतिक प्रगती 13.13% असून आर्थिक प्रगती 12.86% आहे.
प्रकल्प वैशिष्ट्ये
| प्रकल्पाची एकूण लांबी | 11.84 कि.मी. (त्यापैकी बोगद्याची लांबी 10.25 कि.मी. व पोचमार्गांची लांबी 1.59 कि.मी.) |
|---|---|
| बोगद्याचा अंतर्गत व्यास | अंदाजे 11.84 मीटर |
| बोगद्याची संरचना | 2 मुख्य मार्गिका + 1 आपत्कालीन मार्गिका आणि पादचारी मार्ग |
| क्रॉस पॅसेजेस | आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित स्थलांतरासाठी प्रत्येक 300 मीटर अंतरावर क्रॉस पॅसेजेस प्रस्तावित आहेत. |
| बांधकामाची पद्धत | टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे |
| प्रकल्पाची किंमत | ₹18,838 कोटी (IDC शुल्कासह) |
| प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी | 60 महिने |
| S. No. | Title | Download |
|---|---|---|
| 1 | ESZ committee approval | Download |
| 2 | LOA | Download |
| 3 | Pkg-1 LOA | Download |
| 4 | General Consultant LOA | Download |
| 5 | General Consultant NTP | Download |
| 6 | TBTT Forest Clearance from GOI MOEFCC | Download |
| 7 | Administrative approval 154 meeting EC MMRDA | Download |
| 8 | Working permission from APCCF | Download |
| 9 | FRA – Mumbai Sub Urban (Borivali Side) | Download |
| 10 | FRA – Thane Side | Download |
| 11 | TBTT stage-1 Forest Clearance from GOI MOEFCC | Download |
| 12 | NBWL approval MOM - 77th meeting | Download |
| 13 | SBWL approval for TBTT project | Download |
| 14 | DPR | Download |
| 15 | Eco sensitive zone, Casting yard layout | Download |
| 16 | Environmentally sensitive area | Download |







