inner-banner

सद्यस्थिती

प्राधिकरणाने दि. 15 जानेवारी, 2019 रोजी कल्याण विकास केंद्रमध्ये स्थित सुमारे 906 हे. क्षेत्रासाठी नगर रचना परियोजनेसाठी उद्देश घोषित केला आहे व त्याकरीता संपूर्ण विकास केंद्र क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षणाचे काम दि. 15 मार्च, 2019 ते दि. 22 मार्च, 2019 दरम्यान पूर्ण केले होते. सदर क्षेत्रासाठी नगर रचना परियोजना तयार केल्यानंतर शासनाकडे मंजूरीसाठी सादर होणे अपेक्षित होते. परंतु सदर परियोजना तयार करण्यासाठीचा वैधानिक कार्यवाही करिता अवधी लागणार होता. त्यामुळे सदर नगर रचना परियोजना तयार करुन प्रसिध्द करण्यासाठी वाढीव मुदत मिळणेकरिता प्राधिकरणाने शासनाकडे विनंती केली आहे.

दरम्यान शासनाने आपल्या दि.19 ऑगस्ट, 2020 रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणाने कल्याण विकास केंद्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून त्यांचे कर्तव्य हे विकास प्रस्तावांना मंजूरी देण्यासाठी व इतर कायदेशिर कार्ये करण्यासाठी शासनाचे पुढील आदेश पारीत होईपर्यंत सुरु ठेवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील 27 गावांसाठीच्या मंजूर विकास आराखड्यानुसार व एकत्रिकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली (UDCPR) च्या तरतुदीनुसार कल्याण विकास केंद्रामध्ये प्राधिकरणामार्फत विकास परवानग्यांना मंजूरी देण्यात येत आहे.

Proposed Growth Centre in Kalyan Taluka Type
×

Rate Your Experience