खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्क (KIBP)
नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक २५ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या अधिसूचना क्र.टिपीबी-४३२१/सीआर-१३०/२०२१/नवि-११ आणि शुद्धिपत्र दिनांक ०३/१२/२०२५ अन्वये, मुंबई महानगर प्रदेशाच्या अधिसूचित क्षेत्रामधील तालुका भिवंडी येथील ०९ गावे मौजे खारबांव, मालोडी, पाये, पायेगाव, खार्डी, पालीवली, फिरंगपाडा, गाणे, ब्राम्हणगाव व तालुका वसई येथील ०१ गाव मौजे नागले अशा एकूण १० गावांच्या (सुमारे ५८.५२ चौ.कि.मी.) क्षेत्रात खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्क करिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्ती केली.
त्यानंतर, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी अधिसूचना क्रमांक टीपीएस १२२६/१२२६/४६८/सीआर-५१/२६/खारबांव/यूडी-१२ दिनांक १९/०५/२०२६ अन्वये खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्कच्या क्षेत्रामध्ये लगतच्या अतिरिक्त ३४ महसूली गावांचा (क्षेत्र 117.61 चौ.किमी) समावेश केला आहे. यापैकी भिवंडी तालुक्यातली ०६ महसूली गावे मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रादेशिक योजना क्षेत्रात समाविष्ट असून त्यांचे क्षेत्र सुमारे ४४.१७ चौ.किमी आहे आणि २८ गावे भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रात समाविष्ट असून त्यांचे क्षेत्र सुमारे ७३.४४ चौ.किमी आहे.
3. केआयबीपीचे एकूण क्षेत्रफळ १७६.१३ चौरस किलोमीटर असून त्यात ४४ गावांचा समावेश आहे



