बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
1.बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीची जपणूक करण्यासाठी मुंबई येथे त्यांचे स्मारक उभारण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्र. स्मारक 3114/मुमंस 140/प्र.क्र.375/29, दिनांक 04 डिसेंबर 2014 या अन्वये शक्ती प्रदान समिती गठीत केली.
समितीने शिवाजी पार्क, दादर येथील महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी शिफारस केली. शासननिर्णय क्र. स्मारक 3114/मुमंस 140/प्र.क्र.375/29, दिनांक 27 सप्टेंबर 2016 नुसार महापौर बंगल्यावर स्मारक उभारण्यासाठी आणि शासकीय सार्वजनिक न्यास (Board of Governors/Trustees) स्थापना करण्यास मान्यता देण्यात आल्याची नोंद आहे.
साइट व क्षेत्रफळ:
- महापौर बंगल्याची जागा 30 वर्षांच्या नाममात्र भाड्याने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासास हस्तांतरीत.
- सध्यात उपलब्ध क्षेत्रफळ: 3.00 एकर (यामध्ये केरल्य समाज मंडळाचा अतिरिक्त भूखंड भाडेतत्वावर उपलब्ध).
वास्तुविशारद व कंत्राटी
भूमिका | सविस्तर |
---|---|
वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार | मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स — कार्यादेश दिनांक 21 जुलै 2020. |
परिचालनकर्ता / कंत्राटदार (L-1) | टाटा प्रोजेक्ट्स लि. — कार्यारंभ आदेश दिनांक 24 मार्च 2021. |
कामाचे टप्पे व खर्च (प्रशासकीय मान्यता)
टप्पा | मुख्य घटक | प्रशासकीय मान्यता (₹) |
---|---|---|
टप्पा-1 | प्रवेशद्वार इमारत, प्रशासकीय इमारत, इंटरप्रिटेशन सेंटर, महापौर निवासस्थानाचे वारसा संवर्धन व संग्रहालयामध्ये रूपांतरण, बाह्य विकास व परिसर सुशोभिकरण. | ₹ 250 कोटी |
टप्पा-2 | तंत्रज्ञान घटक — लेझर शो, डिजिटल मॅपिंग/प्रोजेक्शन, कथा-संग्रह, चित्रपट, व्हर्च्युअल रिएलिटी, ऑडिओ-व्हिज्युअल इत्यादी. | ₹ 150 कोटी |
एकूण | ₹ 400 कोटी |
पूर्वीचे शासनादेश व मान्यता:
- नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. एमआरडी-2018/प्र.क्र.147/नवि-7, दिनांक 16 मार्च 2021 (टप्पा-1 ₹250 कोटी; टप्पा-2 ₹150 कोटी).
- प्राधिकरण 151 व्या बैठकीत ठराव क्र.1572 अन्वये 16 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रित ₹400 कोटी प्रशासकीय मान्यता नोंदविण्यात आली.
टप्पा-1 कामाचा कालावधी व मुदतवाढ
- मूळ कालावधी: 14 महिने — अपेक्षित पूर्णता: मे 2022.
- प्रथम मुदतवाढ: 31 मार्च 2023.
- द्वितीय मुदतवाढ: 15 जानेवारी 2024.
- तृतीय मुदतवाढ: 30 जून 2024.
- टप्पा-1 ची अंतिम पूर्णता: 25 डिसेंबर 2024.
सद्य:स्थिती — टप्पा-1 (पूर्ण)
100.00% काम पूर्ण
100.00% काम पूर्ण
100.00% काम पूर्ण
100.00% काम पूर्ण
100.00% काम पूर्ण
भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate): प्रवेशद्वार इमारत, प्रशासकीय इमारत व इंटरप्रिटेशन सेंटर या इमारतींची भोगवटा प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. महापौर निवासस्थानाच्या भोगवटा प्रमाणपत्राच्या पडताळणीची प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रगतीपथावर आहे.
कामाची प्रगती सारांश: टप्पा-1 चे सर्व बांधकाम, संवर्धन आणि बाह्य विकासाचे काम पूर्ण झाले आहे. महापौर निवासस्थानाच्या अंतिम भोगवटा पडताळणीचा प्रक्रिया उर्वरित आहे.