भाडे तत्वारील घरे विभाग
श्री. भूषण चौधरी
प्रमुख - भाडे तत्वारील घरे विभाग / उपसंचालक नगर नियोजन
महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण धोरण 2007 च्या आधारे महाराष्ट्र शासनाने खाजगी क्षेत्राच्या सहभागातून भाडे तत्वावरील घरे योजना 2008 साली सुरु केली आहे व महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणुक केली आहे. शासनाने निर्गमित केलेल्या अधिसुचने अन्वये विकासकास अतिरिक्त 4 चटई क्षेत्र निर्देशांक देण्याबाबतची तरतुद असून (1 रेंटल घटक व 3 विक्रेय घटक) आणि त्याबदल्यात 160/320 चौ.फुट. तळपृष्ठ क्षेत्राची घरे तसेच 25% जमीन विकासकाकडून मोफत प्राप्त होते. सदर योजनेतून उपलब्ध होणा-या सदनिका पात्र व्यक्तींना वाटप करण्यात येतात. भाडे तत्वावरील घरे योजना नवी मुंबई व माथेरान नगरपालिका क्षेत्राव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेशातील नागरीकरण क्षेत्रात सर्व ठिकाणी सन 2008 पासून मुं.म.प्र.वि.प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते.
- मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाने भाडे तत्वावरील घरांच्या 45 प्रकल्पांना लोकेशन क्लिअरन्स दिलेला असून त्यातून सुमारे (320 चौ.फूट तळपृष्ठाची) 31,786 सदनिका तयार होणे अपेक्षित आहे.
- शासनाच्या सूचनेअन्वये प्राधिकरणाने 4,774 रहिवासी सदनिका ठाणे म.न. पालिकेस व 1,438 रहिवासी सदनिका मिरा भाईंदर म.न.पालिकेस हस्तांतरीत केलेल्या आहेत.
- यु-1 व यु-2 क्षेत्रातील 7,601 सदनिका गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवलेल्या असून सुमारे 4,938 वाटपासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
- सुमारे 772 (160 चौ.फूट तळपृष्ठाची 661 व 320 चौ.फूट तळपृष्ठाची 111) व्यापारी सदनिका (दुकाने) तयार होणे अपेक्षित आहे.
- भाडे तत्वावरील घरे योजना राबविण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही करणे.
- पात्र प्रस्तावांना लोकेशनल क्लिअरन्स व नकाशा मंजूरी देणे व सार्वजनिक सुविधाक्षेत्र निर्दिष्ट करणे.
- भाडे तत्वावरील घरांचा ताबा घेणे व वाटप करण्याची प्रक्रिया सुलभ करणे.
- भाडे तत्वावरील घरांच्या बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी अभियांत्रिकी विभागाबरोबर समन्वय साधणे.
- नगरपालिका क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याची प्रक्रिया सुलभ करणे.