inner-banner

ठाणे आणि बोरीवली दरम्यान ट्विन ट्युब रोड बोगदा

ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

प्रकल्प माहिती

ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत राबविला जात आहे. या प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दुहेरी बोगद्यांचे बांधकाम तसेच बोरिवलीकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग व ठाणेकडील घोडबंदर रोड यांना जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचा समावेश आहे.

  • प्रशासकीय मान्यता दिनांक: 10 मार्च 2023
  • प्रशासकीय मान्यतेची किंमत: ₹16,600.40 कोटी
  • एकूण प्रकल्प किंमत (IDC शुल्कासह): ₹18,838 कोटी
  • काम सुरू झाल्याचा दिनांक: 19 मे 2023
  • प्रकल्प कालावधी: 60 महिने (मे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा)

सध्या, ठाणे ते बोरिवली दरम्यान 23 किमीचा प्रवास करताना 1 ते 1.5 तास लागतो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हाच प्रवास फक्त 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.

प्रकल्पाचे तपशील

  • एकूण लांबी: 11.84 किमी
  • बोगद्याची लांबी: 10.25 किमी
  • जोड रस्ते: 1.59 किमी
  • लांबीचे विभागणी:
    • बोरिवली बाजूने: 5.75 किमी
    • ठाणे बाजूने: 6.09 किमी

प्रत्येक बोगद्यात 2 वाहतूक लेन्स आणि 1 आपत्कालीन लेन असेल. दर 300 मीटर अंतरावर क्रॉस-पॅसेजेस असतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढील सुविधा असतील:

  • वायुवीजन प्रणाली
  • अग्निशमन उपकरणे
  • धूर शोधक उपकरणे
  • रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह / एलईडी माहिती फलक

बांधकाम व तंत्रज्ञान

  • हा प्रकल्प 3 पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे:
    • 2 स्थापत्य (सिव्हिल) पॅकेजेस - चालू आहेत
    • 1 MEP पॅकेज (वायुवीजन, सुरक्षा व्यवस्था इ.) - लवकरच सुरू होणार
  • कंत्राटदार: मे. मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
  • सल्लागार: मे. हिल–टीसीई संयुक्त उद्यम (JV)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे संवेदनशील क्षेत्र असल्याने, पर्यावरणपूरक पद्धतीने टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरून बोगदे खोदले जात आहेत.

TBM यंत्रणांची वैशिष्ट्ये

  • कटर हेडचा व्यास: 13.34 मीटर
  • एकूण लांबी: 86 मीटर
  • वजन: सुमारे 2,500 टन
  • प्रकार: सिंगल-शिल्ड ओपन मोड मशीन

प्रगती (31 जुलै 2025 पर्यंत)

  • भौतिक प्रगती: 7.99%
  • आर्थिक प्रगती: 7.37%

अपेक्षित फायदे

  • ठाणे आणि बोरिवली दरम्यान थेट व जलद दळणवळण
  • घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट
  • वायू व ध्वनी प्रदूषण कमी होणे
  • परिसराचा सर्वांगीण व शाश्वत विकास