inner-banner

सूर्य प्रादेशिक पाणीपुरवठा योजना

Surya Scheme
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
पाणी पुरवठा स्त्रोत व्यवस्थापन कक्ष
सद्यस्थितीत चालू असलेल्या प्रकल्पांची संक्षिप्त टिप्पणी

1) 403 दशलक्ष लिटर प्रति दिन क्षमतेची सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना :-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चिम उप-प्रदेशातील मिरा-भाईदर व वसई-विरार शहर महानगरपालिका तसेच याच परिसरातील प्राधिकरणाची भाडे तत्वावरील घरकुल प्रकल्प आणि 27 गांवे यांच्या पाणी पुरवठयासाठी 403 द.ल.लि.प्रतिदिन क्षमतेची सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे.

दिनांक 19 ऑक्टोबर, 2016 रोजी संपन्न झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 141 व्या बैठकीत सुर्या पाणी पुरवठा प्रकल्पास तसेच त्यासाठी लागणारा अपेक्षित खर्च ₹1977.29 कोटी यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या आराखडयानुसार सुर्या धरणाजवळील कवडास बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी सुर्यानगर येथील प्रस्तावित जलप्रक्रिया केंद्रात शुध्द करण्यात येईल. अशाप्रकारे शुध्द केलेले पाणी राज्य महामार्ग, जिल्हा परिषद रोड व राष्ट्र्रीय महामार्ग क्र. 8,च्या बाजूने टाकण्यात येणाऱ्या भूमिगत जलवाहिनीद्वारे वसई-विरार महानगरपालिकेकरिता काशिदकोपर येथील जलाशय व मिरा-भाईदर महानगरपालिकेचा घोडबंदर-चेने येथील जलाशयापर्यत पाठविण्यात येईल.

प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मेसर्स एल ॲन्ड टी. लि. यांचा प्रस्ताव योजनेची रचना, उभारणी, प्रचलन व परिरक्षण आणि हस्तांतरीत करणे ( Design, Build, Maintain, Operate, and Transfer, (DBMOT) या तत्वावर एकुण ₹1329.01 कोटी रक्कमेचा दिनांक 26 मे,2017 रोजी संपन्न झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या 253 व्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार कंत्राटदारास दिनांक 4 ऑगस्ट, 2017 रोजी कार्यादेश देऊन कामास सुरुवात करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची सर्व कामे, प्रगतीपथावर असून जलवाहिनी टाकण्याच्या एकूण कामातील 80.71 कि.मी. लांबीपैकी 69.05 कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 1.70 कि.मी. लांबीच्या मेंढवण बोगद्याचे काम 100% पूर्ण झाले आहे व तूंगारेश्वर बोगद्याचे काम प्रगतीपथावर असून सद्यस्थितीत 4500 मी. पैकी 3750 मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कवडास येथील उद्ंचन केंद्राचे काम 98% पूर्ण झाले आहे व वेती येथील जलशुध्दिकरण केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर असून 96% काम पूर्ण झाले आहे. वसई-विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काशिदकोपर येथील संतुलन टाकीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या चेणे येथील संतुलन टाकीचे काम प्रगतीपथावर असून 42% काम पूर्ण झालेले आहे. सर्वसाधारण पणे संपूर्ण प्रकल्पाचे 85% काम पूर्ण झालेले आहे. संपूर्ण योजना दोन टप्प्यामध्ये कार्यान्वित करण्याचे प्राधिकरणाचे नियोजन आहे.

1) टप्पा-1 (वसई-विरार महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणे):–

या टप्प्यामध्ये वसई-विरार ला पाणी देणेसाठी आवश्यक सर्व कामे जवळजवळ पूर्णत्वास आलेली आहेत. उद्ंचन केंद्र व जलशुध्दिकरण केंद्राची चाचणी पूर्ण झाली असुन जलवाहिनीची चाचणी टप्प्याटप्प्याने सुरु असून मे अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सदर योजनेतून वसई-विरार महानगरपालिकेस माहे जून, 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेमधून वसई-विरार महानगरपालिका व इतर 17 गावांना मिळून 185 द.ल.लि. पाणी मिळणार आहे. हे पाणी जवळजवळ 14 लक्ष लोकांना पुरेल.

2) टप्पा-2 (मिरा-भाईंदर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणे):-

या टप्प्यामध्ये मिरा-भाईंदर महानगरपालिकेस माहे जानेवारी, 2024 अखेर पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. सदरच्या योजनेमधून मिरा-भाईंदर महानगरपालिकेस (218 द.ल.लि.) व वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील उर्वरित 27 गावांना पाणी मिळणार असून हे पाणी जवळजवळ 16 लक्ष लोकांना पुरेल.

कवडास Pick up weir चे बांधकाम :- (सदर प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असून प्रकल्पास लागणारा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून पुरविला जात आहे)

सुर्या धरण प्रकल्पाअंतर्गत दोन धरणे असून सुर्या नदीवर मुख्य धरण धामणी, ता. विक्रमगड येथे बांधण्यात आले असून सुमारे 8 कि. मी. अंतरावर कवडास ता. विक्रमगड येथे 13.70 द.ल.घ.मी. पाणीसाठा क्षमतेचा उन्नैयी बंधारा बांधण्यात आलेला आहे. अतिरिक्त 13.41 द.ल.घ.मी. पाणीसाठा करणेसाठी कोंकण पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सदर बंधाऱ्याच्या 67 मी. खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे प्रस्तावित आहे. सदर कामामुळे काही प्रमाणात सिंचन क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांची दिनांक 08 जुलै, 2019 रेाजीच्या 148 व्या बैठकीत ₹184.60 कोटी रक्कमेस मान्यता देण्यात आली आहे. (कवडास उन्नैयी बंधारा ₹172.71 कोटी व वक्राकार दरवाजे ₹11.89 कोटी). सदरचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अर्थ सहाय्यातून कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार असून त्यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्यात दिनांक 06 सप्टेंबर, 2019 रोजी सदर कामाचा सामंजस्य करारनामा करण्यात आला आहे.

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांनी प्रकल्पाच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिनांक 11 नोव्हेंबर, 2019 रोजी मे. नोबल इंडिया कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांना दिले असून त्यानुसार प्रकल्पाचे काम दिनांक 02 मार्च, 2020 रोजी सुरु करण्यात आले आहे. सदर कामाचा कालावधी कार्यारंभ आदेश पासून 36 महिने (पावसाळा वगळून) म्हणजेच डिसेंबर, 2024 पर्यंत आहे. तसेच प्रकल्पावर मार्च, 2023 पर्यंत झालेला खर्च ₹54.78 कोटी इतका आहे. प्रकल्पाचे काम सर्वसाधारणपणे 44% पूर्ण झाले असून माहे डिसेंबर, 2024 अखेर काम पूर्ण करण्याचे कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचे नियोजन आहे.

3) सुर्या नदीवर पाच कोल्हापूर पध्दतीचे बांधकाम :-

(सदर प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असून प्रकल्पास लागणारा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून पुरविला जात आहे)

सुर्या धरणातून जलसंपदा विभागातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास 146.33 द.ल.घ.मि. सुर्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित आहे. सदर आरक्षणामुळे सिंचन क्षेत्रात संभाव्य कपातीचा मुद्दा उपस्थित करुन सुर्या धरण पाणी बचाव संघटना व स्थानिक कष्टकरी संघटना यांनी पाणी पुरवठा योजनेस विरोध दर्शविला होता. या संदर्भात संघटनांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनूषंगाने मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 05 मे, 2018 रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये सिंचन क्षमता वाढवण्याकरीता करावयाच्या उपाययोजणांची अंमलबजावणी करण्याचे सुचविले.

दिनांक 14 नोव्हेंबर, 2018 रोजी मा. मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत अतिरिक्त 2.29 द.ल.घ.मी. पाणीसाठा करण्यासाठी उन्नैयी बंधाऱ्याच्या अधोभागात सुर्या नदी पात्रात पाच कोंकण पध्दतीचे बंधारे जलसंपदा विभागामार्फत बांधण्याचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास सादर करण्यात आला. सदर प्रस्तावास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांची दिनांक 07 जुलै, 2020 रोजीच्या 149 व्या बैठकीत ₹ 50.981 कोटी रक्कमेस मान्यता देण्यात आली आहे. सदर बंधाऱ्यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. कों.प. बंधाऱ्याचे नांव निविदा रक्कम(कोटीत) पाणी साठा (द.ल.घ.मि.) पुर्णत्वाचा दिनांक
1 घोळ 7.474 0.162 काम पूर्ण
2 अंबोली 8.01 0.544 मे – 2023
3 उर्से 11.849 0.748 मे – 2023
4 चिंचारा 15.489 0.129 काम पूर्ण
5 गारगाव 8.159 0.644 मे - 2023
एकुण 50.981

मार्च, 2023 पर्यंत झालेला खर्च ₹40.503 कोटी इतका आहे. उर्वरित कामे डिसेंबर, 2023 अखेर पूर्ण करण्याचे कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे नियोजन आहे.

4)देहरजी मध्यम प्रकल्प (सदर प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असून प्रकल्पास लागणारा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून पुरविला जात आहे)

देहरजी मध्यम प्रकल्प, हा पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावा जवळील पश्चिम वाहिनी नदी खोरे समुहातील वैतरणा नदीच्या उप खोऱ्यातील देहरजी नदीवर स्थित आहे. या प्रकल्पांतर्गत देहरजी नदीवर 93.22 द.ल.घ.मी. क्षमतेचे मातीचे व संधानकातील धरण प्रस्तावित आहे.

सद्यस्थितीत सुधारित प्रशासकीय मान्यते नुसार कोंकण पाटबंधारे विकास महामंडळा तर्फे देहरजी मध्यम प्रकल्पास अंदाजे ₹1443.72 कोटी इतक्या निधीची आवश्यकता असून सदर निधी पुरवठ्या संबंधीचा प्रस्ताव कों.पा.वि. महामंडळाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास सादर केला आहे व त्यास प्राधिकरणाच्या दि.20/10/2022 रोजीच्या 153 व्या बैठकीत मंजूरी मिळालेली आहे. देहरजी प्रकल्प प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून राबविण्याकरिता मुं.म.प्र.वि. प्राधिकरण व कों.पा.वि. महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारनामा पूर्ण झाला आहे. सामंजस्य करारानुसार धरणाची मालकी व पाणी वाटपाचे अधिकार प्राधिकरणाचे असणार आहेत.

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाने सन 2006-2007 मध्ये निविदा मागवून देहरजी मध्यम प्रकल्पाच्या कामाचा कार्यारंभ आदेश मे.पी.व्ही.आर. प्रोजेक्ट सलि., पुणे यांना दिनांक 27/07/2006 रोजी देण्यात आलेला आहे. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश यांच्या दि. 11/12/2020 च्या पत्रान्वये कामाच्या नियोजनानुसार दि.30/06/2024 पर्यंत तृतीय मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.

i) प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 445.29 हे. वन जमिन हस्तांतरणाच्या प्रस्तावास दि.19/02/2016 रोजीच्या केंद्र शासनाच्या पत्रान्वये टप्पा-2 ची मंजूरी प्राप्त आहे.
ii) देहरजी प्रकल्पास आवश्यक जवळपास सर्व सांविधानिक मान्यता प्राप्तआहे.
iii) सदर प्रकल्पामुळे 3 गांवे (खुळेद, साखरे, जांभे) अंशत: बाधित होत आहेत. प्रकल्प बाधीत 272 कुटुंबाच्या पुनर्वसनाची कार्यवाही मा. जिल्हाधिकारी, पालघर यांचे मार्फत प्रगतीपथावर आहे.
iv) धरण व बुडित क्षेत्रासाठी आवश्यक 234.93 हे. खाजगी भुसंपादनाची कार्यवाही मा. जिल्हाधिकारी, पालघर यांचे मार्फत प्रगतीपथावर आहे.
v) सद्यस्थितीत कंत्राटदाराने माहे मे, 2022 पासून पाया खोद काम सुरु केलेले असून माहे नोव्हेंबर, 2022 पासून घळ भागात संधानकाचे बांधकाम सुरु केले आहे. माहे मे, 2023 अखेर धरणाच्या बांधकामाची भौतीक प्रगती 40% आहे.
vi) कोंकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे सदरचे काम 2027 पर्यंत संपूर्णरित्या पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

प्राधिकरणाने देहरजी प्रकल्पाकरीता माहे मे, 2023 पर्यंत भूसंपादनाकरिता ₹ 35.85 कोटी व कंत्राटदाराच्या देयकापोटी ₹276.23 कोटी इतका निधी कोंकण पाटबंधारे विकास महामंडळास पुरवठा केलेला आहे.

5) देहरजी मध्यम प्रकल्पातून पिण्याचे पाणी पुरवठा करण्याकरीता तांत्रिक सल्लागारामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे :-

देहरजी मध्यम प्रकल्प, हा पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावा जवळील पश्चिम वाहिनी नदी खोरे समुहातील वैतरणा नदीच्या उप खोऱ्यातील देहरजी नदीवर स्थित आहे. या प्रकल्पातून एकूण 95.60 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा तयार होणार असून यापैकी 93.22 द.ल.घ.मी. (255 द.ल.लि. प्रतिदिन) पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. मुं.म.प्र.वि. प्राधिकरण व कों.पा.वि. महामंडळ यांच्यातील झालेल्या सामंजस्य करारनाम्यानुसार देहरजी धरणाची मालकी व उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे अधिकार प्राधिकरणाचे असणार आहेत. त्यानुसार प्राधिकरणाने सदर उपलब्ध होणारे पाणी कवडास उनैयी बंधारा/सुर्यानगर येथील जलशुध्दिकरण केंद्र येथे आणण्याचे व उर्वरित पाणी महानगर क्षेत्रातील इतर संस्थांना वाटप करण्याचे ठरविले आहे.

प्राधिकरणाच्या दि. 20/10/2022 रोजीच्या 153 व्या बैठकीत देहरजी धरणातून कवडास बंधाऱ्यापर्यंत पाणी आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या ठरावास मंजूरी मिळालेली आहे. सदर सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये देहरजी धरण ते 28 कि.मी. स्थित कवडास बंधारा/सुर्यानगर जलशुध्दिकरण केंद्र पर्यंत 150 द.ल.लि. पाणी आणून अस्तित्वातील जलशुध्दिकरण केंद्राची क्षमता वाढविणे व उर्वरित 105 द.ल.लि. पाणी महानगर क्षेत्रातील इतरांना गरजेनुसार पुरवठा करणे या कामाचा समावेश असणार आहे.

त्यानुसार प्राधिकरणामार्फत वरील कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून मे. DRA Consultant Pvt Ltd, Nagpur यांना दि. 17/05/2023 रोजी LoA देण्यात आला आहे. सुरक्षा ठेव व कंत्राटाचा करार पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सल्लागाराने कर्मचाऱ्यांची टिम कार्यक्षेत्रावर पाठवून सर्वेक्षण व इतर कामे सुरू केलेली आहेत.

6) काळू पाणी पुरवठा प्रकल्प :-

(सदर प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असून प्रकल्पास लागणारा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून पुरविला जात आहे)

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ यांनी काळू नदीवर, गांव खापरी, ता. मुरबाड, जि. ठाणे येथे काळू धरण बांधावयाचे काम हाती घेतले असून सदर बांधकाम प्राधिकरणाच्या निधीतून पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांची दिनांक 03 ऑगस्ट, 2009 रेाजीच्या 125 व्या बैठकीत ₹661.01 कोटी रक्कमेस मान्यता दिली आहे. या धरणातून 1140 द.ल.ली.प्रतिदिन इतका पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून मुंबई महानगर क्षेत्राच्या पूर्व उपप्रदेशातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कुळगांव- बदलापूर, अंबरनाथ आणि त्या भागातील 359 गांवे यांच्या पाणी पुरवठयासाठी उपयुक्त होणार आहे. प्राधिकरणातर्फे मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी आतापर्यंत प्रकल्पावर ₹110 कोटी खर्च करण्यात आला आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पातील वन जमिनी संदर्भात वन विभागाची परवानगी नसल्या कारणाने धरण बांधकामास दिनांक 2 मार्च,2012 पासून देण्यात आलेली स्थगिती दिनांक 13 जानेवारी, 2020 रोजी मा.उच्च न्यायालयाने उठविण्याचे आदेश दिले आहेत. प्रकल्पातील भूसंपादनाचे काम कोंकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे प्रगतीपथावर आहे. वनविभागाची अंतीम मान्यता अजून प्राप्त झालेली नाही.

प्रकल्पाच्या कामास चालना मिळणेसाठी खालील प्रकरणाचा निपटारा कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचेमार्फत होणे आवश्यक आहे.

1) वनजमिनीच्या (999.328 हे.) प्रस्तावास अंतिम मान्यता मिळणे कामी प्राधिकरणाने वर्ग केलेली ₹396.44 कोटी सुधारित NPV ची रक्कम वनविभागास अदा करणे.
2) खाजगी जमीनीचे (1259.54 हे.) भूसंपादन करणे.
3) प्रकल्प बाधितांचे (3169 लेाकसंख्या) पुनर्वसन करणे.
4) लाचलुचपत विभागाची चौकशी पूर्ण होऊन अंतिम निर्णय होणे.
5) निविदा विखंडना बाबतची रिट याचिका (1759/2017) चा अंतिम निकाल प्राप्त होणे.

प्राधिकरणाने काळू पाणी पुरवठा प्रकल्पाकरीता माहे मार्च, 2023 पर्यंत धरण बंधकामासाठी ₹114.10 कोटी व वनजमिनीची नक्त वर्तमान मुल्य (NPV) भरण्याकरीता 396.44 कोटी इतका निधी पुरवठा केलेला आहे.

Loading content ...