नगररचना विभाग
श्री. प्रदीप एम.यादव
प्रमुख
नगररचना विभाग
नागरी क्षेत्रामध्ये विचारशील, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत योजना समाविष्ट करून मुंबई शहराचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी प्राधिकरणामध्ये 10 मार्च 2021 रोजी नगर रचना विभागाची स्थापना करण्यात आली. शहराचे सौंदर्य, कार्यक्षमता आणि सांस्कृतिक ओळख वाढवून शहराच्या रूपात बदल घडविण्यात नगर रचना विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. नगर आणि नागरिकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत असलेल्या चैतन्यशील, सुलभ आणि लोक-स्नेही स्थळे तयार करण्यावर हा विभाग लक्ष केंद्रित करतो.
नगर रचना विभाग
नागरी क्षेत्रांमध्ये विचारशील, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत योजनांचा समावेश करून मुंबई शहराचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी प्राधिकरणामध्ये 28 मे 2021 रोजी नगर रचना विभागाची स्थापना करण्यात आली. शहराचे सौंदर्य, कार्यक्षमता आणि सांस्कृतिक ओळख वाढवून शहराच्या रंगरुपात बदल घडविण्यात (नगर रचना विभाग) महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. नगर आणि नागरिकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत असलेल्या चैतन्यशील, सुलभ आणि लोक-स्नेही स्थळे तयार करण्यावर हा विभाग लक्ष केंद्रित करतो.
नगर रचना विभागाद्वारे हाताळले जाणारे महत्वाचे प्रकल्पः
1. बी. के. सी. सौंदर्यीकरण आणि प्लेसमेकिंग कामे
नागरी जीवनाचा दर्जा सुधारणे आणि जनतेसाठी संस्मरणीय जागा निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांसह वांद्रे कुर्ला संकुलातील सार्वजनिक स्थळांचा दर्जा उंचाविण्याकरिता नगर रचना विभाग सक्रियपणे सहभागी आहे. खालील प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित/पूर्ण केले गेले आहेतः
- पश्चिम द्रुतगती महामार्ग उड्डाणपूल खालील सार्वजनिक प्लाझांचा विकास, वांद्रे:- (पूर्व) या प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग उड्डाणपूलाखालील वापरात नसलेल्या जागांचे चैतन्यदायी सार्वजनिक प्लाझामध्ये रूपांतर झाले. पश्चिम द्रुतगती महामार्ग उड्डाणपूलाखालील जागा नागरिक आणि अभ्यागतांसाठी एक स्वागतार्ह स्थळ झाले आहे. हे सार्वजनिक प्लाझा सुरक्षित आणि आच्छादित पादचारी मार्ग, अवजड वाहनांच्या वाहतुकीचा आवाज आणि धूर कमी करण्यासाठी लँडस्केप, पर्यायी पार्कलेट, पुरेसा प्रकाश अश्या विविध योजनेने विकसित केले गेले आहेत. या प्लाझाचा विकास मार्च 2022 मध्ये पूर्ण झाला आहे.
- पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे पूर्व येथील वाहतुक बेट प्लाझाचा विकास:- हा वाहतुक बेट प्लाझा नागरी लँडस्केपमध्ये योगदान देतो, एक आश्रयस्थान म्हणून काम करतो तसेच विश्रांती आणि संवादासाठी क्षेत्र प्रदान करतो. बसण्याकरिता जागा, झाडे-झुडपे आणि फुलांचे सॉफ्टस्केप, दिशादर्शक, सुलभतेसाठी उतरंड (रॅम्प) त्या प्लाझामध्ये इ. समाविष्ट आहेत. हा वाहतूक बेट प्लाझा रस्त्यांच्या किमान जंक्शन सह सुधारित सुरक्षा प्रदान करतो, वांद्रे कुर्ला संकुल आणि सरकारी वसाहतीमध्ये पादचाऱ्यांना सहजपणे जाता येणे, (पादचाऱ्यांसाठी)पुरेशी जागा जी एक परिपूर्ण क्षणिक विश्रांती क्षेत्र म्हणून काम करते. या प्लाझाचा विकास मार्च 2022 मध्ये पूर्ण झाला आहे.
-
वांद्रे कुर्ला संकुलाच्या एन्ट्रन्स प्लाझाचा विकास:- हा प्रकल्प वांद्रे कुर्ला संकुलाच्या प्रवेशद्वाराला पुनरुज्जीवित करणारा, जनतेला मनोरंजनासाठी जागा उपलब्ध करून देणारा आणि शहराचा एकंदर नागरी अनुभव वाढवणारा प्रकल्प आहे. वांद्रे कुर्ला संकुल प्रवेश प्लाझा हा प्राधिकरणाच्या कलानगर जंक्शन विकास आराखडाच्या पुनरुज्जीवनात व्यापक प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्यामध्ये नागरी स्थळांची सूक्ष्म पातळीवरील योजना आणि नियोजन समाविष्ट आहे. अशा प्रकारची एक चैतन्यमय सार्वजनिक मोकळी जागा मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलाच्या प्रवेशद्वारावर तयार करणे या मागील दृष्टीकोन होता. हा प्लाझा स्थानिक रहिवाशांना आणि कार्यालयाला जाणाऱ्या चाकरमान्यांना आकर्षित करेल. या रचनेत शिल्पे, पाण्याची कारंजे, बसण्याच्या जागा, सौंदर्यीकरणासाठी प्रकाशयोजना, उड्डाणपुलाच्या खांबांवर चैतन्यदायी कलाकृती आणि विविध प्रकारच्या झुडपांसह लावलेल्या सॉफ्टस्केपचा समावेश आहे. उड्डाणपुलाच्या खाली 2828 चौ.मी क्षेत्रावर पसरलेला प्लाझा नगर रचनेच्या तत्वांआधारे विकसित केला आहे. उड्डाणपुलाच्या खाली उरलेल्या जागेचे सार्वजनिक मनोरंजनात्मक आणि कार्यात्मक क्षेत्रात रूपांतर करण्याचा आणि त्याद्वारे वांद्रे कुर्ला संकुलाच्या प्रतिमाक्षमता वाढविण्याचा या प्लाझाचा हा एक प्रयत्न आहे. सदर प्लाझाचा विकास मार्च 2022 मध्ये पूर्ण झाला आहे.
-
वांद्रे कुर्ला संकुलामध्ये जी-20 शिखर परिषदेसाठी चिन्हे बसवणेः- या विभागाने 2023 मध्ये जी-20 शिखर परिषदेसाठी वांद्रे कुर्ला संकुला मधील प्रमुख ठिकाणी स्वागत चिन्हे बसवली, ज्यामुळे अभ्यागतांना एकसंध आणि स्वागतार्ह दृष्टीचा अनुभव घेता आला.
वांद्रे कुर्ला संकुलामध्ये खालील प्रकल्प कार्यान्वित होत आहेतः -
-
बी. के. सी. आर्ट प्लाझा, वांद्रे (पूर्व):- एक सर्जनशील केंद्र म्हणून कार्यन्वित असलेल्या बी.के.सी. आर्ट प्लाझाची रचना लोक एकत्रित जमण्यासाठी किंवा सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी भेटण्याचे ठिकाण म्हणून करण्यात आली आहे. यात एम्फीथिएटर, मिनी स्टेज, सुगंधी झाडांची उद्याने, फिरणारे खाद्य ट्रक, खाद्य क्षेत्र, प्रदर्शनाकरिता जागा, पदपथ, वाहनतळ, बसण्याच्या जागा, शौचालये, सौंदर्यीकरणाकरिता दिशादर्शक प्रकाश योजना, इ. सुविधा असतील. बी.के.सी. आर्ट प्लाझाची रचना केवळ सार्वजनिक संवादासाठीच नव्हे तर सणासुदीच्या काळात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लोकांची प्रतिभा दाखवण्यासाठी देखील केली गेली आहे. या बहु-वापराच्या संकल्पनेमुळे प्लाझाला संस्कृती, कला आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र बनण्यास मदत होईल, ज्यामुळे लोकांना वर्षभर आनंद घेण्यासाठी एक अद्वितीय नागरी वातावरण तयार होईल. या प्लाझाचा विकास सुरू असून तो जून 2025 पर्यंत पूर्ण होईल.
-
शिल्पांच्या स्थापनेसह करमणुकीचे मैदान, वाहतूक बेटांचा विकास:- वांद्रे कुर्ला संकुलातील सार्वजनिक क्षेत्र वाढवून, दुर्लक्षित करमणुकीचे मैदाने/मोकळी जागा/ वाहतूक बेटे सुधारणे, विविध जाहिराती/प्लेसमेकिंग सारख्या ठिकाणी शिल्पांची स्थापना करून सौंदर्यानुभव वाढविणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकल्पांच्या विकासाला लवकरच सुरुवात होणार आहे.
वांद्रे कुर्ला संकुलाच्या 'जी' ब्लॉकमध्ये लक्ष्मी टॉवर आणि कोटक महिंद्रा बँकेच्या इमारतींमधील दुर्लक्षित मनोरंजन मैदान एक चैतन्यशील सार्वजनिक जागा म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. यात दृश्याकर्षण वाढवण्यासाठी मिनी-एम्फीथिएटर, पदपथ, हिरवळ, फुलांच्या झुडपे आणि झाडांची लागवड यासारख्या विविध योजनांचा समावेश आहे.
या क्षेत्राचे दृश्य आकर्षण वाढवण्यासाठी आणि हिरे उद्योगातील त्याचे महत्त्व दर्शविण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलाच्या 'जी' ब्लॉकमधील भारत डायमंड बोर्स इमारतीजवळ हिऱ्यांची प्रतिकृती स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे.
वांद्रे कुर्ला संकुलाच्या 'जी' ब्लॉकमध्ये भारत डायमंड बोर्स इमारतीला लागून गोलाकार आकाराच्या पट्ट्यांचे शिल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे, जे त्याच्या सभोवतालच्या परिसराला पूरक असून ह्या क्षेत्राला एक अद्वितीय कलात्मक स्पर्श देईल.
वांद्रे कुर्ला संकुलाच्या 'जी' ब्लॉकमधील भारतीय वृत्तपत्र सेवा इमारतीच्या कुंपनाला लागून एक अमूर्त शिल्प स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे त्याच्या आधुनिक आणि कलात्मक रचनेसह क्षेत्राचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढेल.
एम. टी. एन. एल. जंक्शनवर सर्जनशील स्वागत शिल्पे स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे जे वांद्रे कुर्ला संकुलामध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना एक स्वागतोत्सुक चिंन्ह आमंत्रण देणारी खूण म्हणून काम करेल आणि त्यांच्या कलात्मक रचनेसह क्षेत्राचे दृश्य आकर्षण वाढवते.
या विभागामार्फत वांद्रे कुर्ला संकुलाच्या 'जी' ब्लॉकमध्ये सेबी इमारतीपासून कॅनरा बँक इमारतीपर्यंतच्या आर. जी. च्या सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून जवळपासच्या कार्यालयीन कर्मचारी आणि अभ्यागतांना पुरेसा प्रकाश आणि सुलभ प्रवेशासह कार्यक्षम, आनंददायी आणि टिकाऊ मार्ग सुनिश्चित करण्यासाठी अनेक प्रमुख घटकांसह आनंददायक अनुभवासाठी निसर्गरम्य हिरवळीसह पादचाऱ्यांना विनाअडथळा प्रवास उपलब्ध करून दिला जाईल.
2. मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो स्थानकांच्या अद्ययावतीकरणाची कामे
शहराच्या मेट्रो रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या सौंदर्यात्मक उन्नतीकरणात नगर रचना विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. खालील प्रमुख क्षेत्रे आहेत ज्यात या विभागाने शहराचे एकूण दृश्य आकर्षण सुधारताना मेट्रोचा अनुभव वाढविण्यात योगदान दिले आहेः -
- मेट्रो लाईन पिल्लर्स आणि वायडक्ट पेंटिंग्जः- मेट्रो व्हायडक्ट्सना आधार देणाऱ्या संरचनात्मक स्तंभांचे सौंदर्यीकरण करणे, नेत्रदीपक उत्तेजक आणि आकर्षक नागरी वातावरण निर्मिती करणे हे मेट्रो स्तंभाचे पेंटिंग्जचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. बऱ्याचदा साधारण आणि उपयोगितावादी म्हणून पाहिले जाणारे हे स्तंभ आता कलात्मक कॅनव्हासमध्ये रूपांतरित झाले आहेत. मेट्रो स्तंभ आणि वायडक्टचे दृश्य आकर्षण सुधारण्यासाठी योजना विकसित केल्या गेल्या आहेत. सध्या सर्व मेट्रो मार्ग रंगविण्याचे काम सुरू आहे.