inner-banner

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र (सी.एस.एम.आय.ए.एन.ए.)

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी असून याद्वारे भारत ४१ आंतरराष्ट्रीय व ४० राष्ट्रीय गन्तव्यांशी जोडले गेले आहे. या क्षेत्रामधील जमिनी या भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या मालकीच्या असून त्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा.लि. यांना एप्रिल, २००६ मध्ये झालेल्या भाडेपट्टा करारानुसार ३० वर्षांकरिता हस्तांतरीत केल्या आहेत. सदर करार हा पुढील ३० वर्षांकरीता वाढविता येऊ शकतो. भारतीय विमानतळ प्राधिकरण व मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट प्रा.लि. यांच्यामध्ये एप्रिल, २००६ मध्ये झालेल्या ऑपरेशन, मेंटेनन्स व डेव्हलपमेंट करारानुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट प्रा.लि. यांनी सदर क्षेत्रामधील नियोजन, विकसन, बांधकाम व देखभाल करावयाची आहे.

शासनाने त्यांच्या दिनांक १४ मे, २००९ रोजीच्या अधिसूचनेद्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सुमारे ८०२.०३ हे. क्षेत्रफळाच्या मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्राकरीता विशेष नियोजन प्रधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. शासनाने त्यांच्या दिनांक १७ मे, २०१३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्राचा अंतरिम विकास आराखडा (झोपडयांखालील क्षेत्रवगळता – १२५.०३ हे.) मंजूर केला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट प्रा.लि. हे भाडेपट्टेदार या नात्याने मंजूर अंतरिम विकास आराखडयानुसार मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रामधील पायाभूत सुविधा, वैमानिक सुविधा व इतर सुविधांचा विकास करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रामधील शहरस्तरावरील पायाभूत सुविधा जसे पेय जलवाहिनी, नाले, विदयुतसेवा, सांडपाणी इत्यादी सोईंचे विकसन/देखरेख मुंबई महानगरपालिकेने करावयाचे आहे. मुंबई महानगर प्रदेशविकास प्राधिकरण हे सदर अधिसूचित क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने सदर क्षेत्रामधील कार्यरत प्रकल्पांना मंजूरी व इतर बांधकाम परवानग्या देत असते. या व्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे विमानतळाच्या सभोवतालच्या क्षेत्रात विविध मेट्रो मार्गिकांचे विकसन करीत आहे ज्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची देखील सोय होईल.

List of Maps

Mumbai(Chhatrapati Shivaji) International Airport Notified Area
Sr.No. Title Download/View
1 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र सुधारित विकास नियंत्रण नियमावली व अंतरिम विकास आराखडा ची सूचना (53.17 KB)
2 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रासाठी प्रस्तावित भूवापर नकाशा (4.12 MB)
3 सी.एस.एम.आय.ए.एन.ए. मधील वगळलेल्या क्षेत्राची अधिसूचना - ३ मार्च २०१४ (5.58 MB)
4 विकास नियंत्रण नियमावली क्रमांक ३३ मध्ये सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना - ६ मार्च २०१५ (60.54 KB)
5 मुं.म.प्र.वि. प्राधिकरणाची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रासाठी (सी.एस.एम.आय.ए.एन.ए.) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीची अधिसूचना - १४ मे २००९ (2.81 MB)
6 सी.एस.एम.आय.ए.एन.ए. चा मंजूर अंतरिम विकास आराखडा मंजूरीबाबत अधिसूचना - १७ मे २०१३ (380.5 KB)
7 सी.एस.एम.आय.ए.एन.ए. च्या मंजूर अंतरिम विकास आराखडा (2.41 MB)
8 ७ ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार संकलित सुधारित विकास नियंत्रण नियमावली (12.07 MB)
9 सी.एस.एम.आय.ए.एन.ए. च्या मंजूर अंतरिम विकास आराखडा विकास अहवालाचा सारांश (510.52 KB)
10 सुधारित विकास नियंत्रण नियमावली अधिसूचना - ७ ऑगस्ट २०२४ (2.48 MB)
11 सुधारित विकास नियंत्रण नियमावली अधिसूचना - २९ जूने २०२१ (15.08 MB)