ओशिवरे जिल्हा केंद्र (ओडीसी)
दक्षिण मुंबईतील कार्यालये, बाजारपेठ, व्यापार उद्योग यांचे सुनियोजित विकेंद्रीकरण करण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १९७७ च्या "इष्टतम प्रादेशिक संरचनेच्या" धोरणातून प्रस्तावित नवी मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल इ. नवीन विकास केंद्रांपैकी ओशिवरे जिल्हा केंद्र देखील विकसित करण्याचे प्रस्तावित होते.पश्चिम उपनगरात जोगेश्वरी व गोरेगांव दरम्यान सुमारे 102 हेक्टरच्या जागेत जिल्हा केंद्र विकसित करण्याकरीता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाल्यावर प्राधिकरणाने तयार केलेल्या नियोजन प्रस्तावांस शासनाने दिनांक १६ जानेवारी,१९९२ रोजी मान्यता दिली.
तत्पश्चात शासनाने त्यांच्या दिनांक १८ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या अधिसूचने अन्वये ओशिवरा जिल्हा केंद्रातील स्वामी विवेकानंद रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग हा प्राधिकरणाच्या विशेष नियोजन क्षेत्राच्या हद्दीतून वगळून त्याचा समावेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात केलाआहे. तसेच, शासनाने त्यांच्या दिनांक १८ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या दुस-या अधिसूचने अन्वये ओशिवरा जिल्हा केंद्रातील अनुज्ञेयचटई क्षेत्र निर्देशांक वाणिज्यिक (एकात्मिक विकास) व वाणिज्यिक (रुपांतर) या वापर विभागासाठी १.५ चा ४.००; निवासी, निवासी व दुकाने, आणि मिश्र भूमि उपयोगिता या वापर विभागासाठी १.५ चा ३.०० तसेच सामाजिक व सांस्कृतिक सुविधा, आणि सार्वजनिक व वापर सेवा या वापर विभागासाठी १.० चा ३.०० एवढा केला आहे. मंजूर नियोजन प्रस्तावानुसार जमीन मालकांच्या सहभागाने प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पाणी पुरवठा, पर्जन्य जलवहन व मलनिःसारण या सेवा बृहन्मुंबई महानगरपालिका पुरविते. सद्यस्थितीत प्राधिकरणाने या क्षेत्रातील रस्त्यांचे (पेयजलवाहिनी, पर्जन्य जलवाहिनी व मलनिःसारण वाहिनीसह) बांधकाम हाती घेतले आहे.
List of Maps
Sr.No. | Title | Download/View |
---|---|---|
1 | ओशिवरा जिल्हा केंद्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती बाबतची अधिसूचना | ![]() |
2 | ओशिवरा जिल्हा केंद्राच्या नियोजन प्रस्तावाच्या मंजुरीची अधिसूचना | ![]() |
3 | ओशिवरा जिल्हा केंद्राच्या नियोजन प्रस्तावाची आराखड्यासह पुस्तिका | ![]() |
4 | ओशिवरा जिल्हा केंद्राच्या मंजूर नियोजन प्रस्तावाचा आराखडा | ![]() |
5 | मंजूर नियोजन प्रस्तावामध्ये फेरबदलाबाबतची दिनांक 19.09.2002 रोजीची अधिसूचना | ![]() |
6 | मूं.म.प्र.वि.प्रा. च्या कार्यक्षेत्रातून स्वामी विवेकानंद रस्त्याच्या पश्चिमेकडील क्षेत्र वगळण्याबाबतची दिनांक 18.11.2015 रोजीची अधिसूचना | ![]() |
7 | मंजूर नियोजन प्रस्तावाच्या परिच्छेद 7.2.1 मध्ये फेरबदलाबाबतची ,दिनांक 18.11.2015 रोजीची अधिसूचना | ![]() |
8 | मंजूर नियोजन प्रस्तावाच्या परिच्छेद 7.2.1 मध्ये फेरबदलाबाबतची, दिनांक 31.05.2017 रोजीची अधिसूचना | ![]() |