विभागाची कार्ये
मेट्रो मार्गांची कालबद्ध रीतीने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून आणि विविध केंद्र आणि राज्य प्राधिकरणांशी संबंधित एजन्सी, डीएमआरसी सारख्या संस्था, आशियाई विकास बँक, केएफडब्ल्यू, न्यू डेव्हलपमेंट बँक इत्यादी बाह्य निधी संस्थांशी समन्वय साधण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये एक स्वतंत्र मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेची (Metro PIU) स्थापना करण्यात आली आहे.
मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेमध्ये स्थापत्य, प्रणाली (रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन (एस अँड टी), ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी), प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर), भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत, प्रशासकीय, नगर नियोजन आणि वित्त यांसारख्या विविध विषयांचा समावेश करणारे अनेक विभाग आहेत.
मेट्रो मार्गांचे संरेखन आता Google Earth वर उपलब्ध आहेत आणि MCGM, राज्य आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने "व्यवसाय करणे सुलभ" चा भाग म्हणून MCGM वेबसाइटशी जोडलेले आहेत.
नागरिक आणि विकासक/मालक Google Earth वरील संरेखन नकाशांचा वापर करू शकतात आणि मेट्रो मार्गिकांच्या प्रभावक्षेत्रात मालमत्ता अंशतः किंवा पूर्णत: प्रभावित होत असल्यास प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊ शकतात
NOTE : To open above file's you require "Google Earth" in your system.



