नेरळ परिसर’, ‘कर्जत परिसर’, ‘पोयनाड परिसर’ आणि ‘अलिबाग परिसर’ येथील अधिसूचित क्षेत्रे
1. प्रस्तावना
नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 19 मे, २०२६ रोजीच्या अधिसूचना क्र. टिपीएस-1226/468/प्र.क्र.-51/26/नेपक्षे, कपक्षे, पोपक्षे, अपक्षे/नवि-12 अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमाच्या कलम ४० च्या उपकलम (१) मधील खंड (क) मधील तरतुदीनुसार,
1) अंबरनाथ तालुका, जि. ठाणे येथील 13 महसूली गावे आणि कर्जत तालुका, जि. रायगड येथील 11 महसूली गावे नेरळ परिसर अधिसूचित क्षेत्र म्हणून
२) कर्जत तालुका, जि. रायगड येथील २८ महसूली गावे कर्जत परिसर अधिसूचित क्षेत्र म्हणून;
३) अलिबाग तालुका, जि. रायगड येथील ११ महसूली गावे पोयनाड परिसर अधिसूचित क्षेत्र म्हणून; आणि
४) अलिबाग तालुका, जि. रायगड येथील ११ महसूली गावे अलिबाग परिसर अधिसूचित क्षेत्र म्हणून
अधिसूचित करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची उक्त क्षेत्रांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केले आहे.
2. सद्यस्थिती
सदर अधिसूचित क्षेत्रामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या अनुषंगाने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून आवश्यक असलेली कार्ये पार पाडण्यासाठी तसेच विकास प्रस्ताव तयार करून शासनास मंजूरीकरिता सादर करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
| S. No. | Title | Download |
|---|---|---|
| 1 | विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीबाबतची अधिसूचना, दि. 19/05/2026 | Download |
| 2 | अलिबागची सीमा (ASNA) | Download |
| 3 | कारजातची सीमा(KSNA) | Download |
| 4 | नेरळची सीमा (NSNA) | Download |
| 5 | पोयनाडची सीमा(PSNA) | Download |



